आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२८ : भिशीच्या पैशावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नीलेश नारायण बाविस्कर (वय-२९ रा़वाल्मीकनगर) या तरूणाला तीन जणांनी लोखंडी सुळईने मारहाण केली़ ही घटना रविवारी सकाळी ११़३० वाजता आसोदा रस्त्याजवळ घडली़ जखमी तरूणावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असून याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे़रस्त्यावरून जात असलेला नीलेश बाविस्कर याला हे भांडण दिसताच त्याने त्याठिकाणी धरण्याचा प्रयत्न केला घेतली़ अन् भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्याला दोन ते तीन तरूणांनी मारहाण केली़ एकाने लोखंडी सळईने डोक्यावर मारहाण केली. त्यात तो रक्तबंबाळ झाला़ यासोबतच एक सागर (पूर्ण नाव माहित नाही) हा तरूण देखील हाणामारीत जखमी झाल्याचे समजते़ जखमी अवस्थेत शनिपेठ पोलीस स्टेशन गाठत नीलेश याने तक्रार दाखल केली़ जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले.या घटनेबाबत जखमीच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, नातेवाईक गंगाधर बाविस्कर यांना मुदतीनंतर पंधरा दिवस उलटून सुध्दा भिशीचे पैसे दिले जात नव्हते़ अखेर बाविस्कर हे भिशीचे पैसे मागण्यासाठी गेले असता त्यांना पैसे न देता धक्काबुक्की करण्यात आली़ वाद विकोपाला जाऊन हाणामारी झाली़
जळगावात भांडण सोडविणाऱ्यास सळईने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:38 IST
भिशीच्या पैशावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नीलेश नारायण बाविस्कर (वय-२९ रा़वाल्मीकनगर) या तरूणाला तीन जणांनी लोखंडी सुळईने मारहाण केली़ ही घटना रविवारी सकाळी ११़३० वाजता आसोदा रस्त्याजवळ घडली़
जळगावात भांडण सोडविणाऱ्यास सळईने मारहाण
ठळक मुद्देभिशीच्या पैशावरून सुरू होते भांडणजखमीवर जिल्हा रुग्णालयातशनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल