शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सर्जा राजाचा साज मिळल्याने बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:08 IST

पिकांची स्थिती बिकट असताना आपल्या सर्जा राजाचा पोळा सण कसा साजरा करावा या चिंतेत असतानाच पोळ््याचे साहित्य मिळाल्याने मोठा आधार मिळाला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना पोळ््याचे साहित्य वाटपनेहरु चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमेरु गांधी परिवाराचा उपक्रमशेतकºयांना मिळाला आधार

जळगाव : पिकांची स्थिती बिकट असताना आपल्या सर्जा राजाचा पोळा सण कसा साजरा करावा या चिंतेत असतानाच पोळ््याचे साहित्य मिळाल्याने मोठा आधार मिळाला. त्यामुळे वर्षभर आमच्या सोबत राबणाºया सर्जा राजास आम्ही किमान सजविणार, असे भावनिक उद्गार जिल्हाभरातून आलेल्या शेतकºयांनी येथे काढले.श्री नेहरु चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमेरु गांधी परिवारातर्फे रविवारी शेतकºयांना पोळ््याचे साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. या वेळी आमदार सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, मनपातील भाजपाचे गटनेते भगत बालाणी, बांधकाम व्यावसायिक श्रीकांत खटोड, श्री नेहरु चौक बहुउद्देशीय मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संजय गांधी यांनी केले.आपल्या भाषणात मिलिंद कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे कौतूक करीत मंडळ व गांधी परिवाराने व्यापार व सामाजिक बांधिलकी जपल्याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. पोळा सणाला साहित्य मिळाल्याने आता प्रत्येक शेतकरी हा सण साजरा करू शकेल. या साहित्यामुळे शेतकºयास मोठा आधार मिळाल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी मनोगतातून नमूद केले. सूत्रसंचालन प्रकाश लोडते यांनी केले तर रिकेश गांधी यांनी आभार मानले. प्रवीण हिवरकर, गुलाब कोळी, बाळू पाटील, अमृत शिंदे आदींनी परिश्रम घेतले.१३० गरजूंना मदतीचा हातपिकांची बिकट स्थिती, त्यात सरकारकडून मदत मिळत नाही, अशा स्थितीमुळे पोळा सण कसा साजरा होणार असा प्रश्न शेतकºयांसमोर पडला आहे. त्या मुळे अशा गरजू शेतकºयांनाही पोळा सण साजरा करता यावा यासाठी गावोगावी जीवून शेतकºयांची माहिती गोळा करण्यात आली व गरजू शेतकºयांची निवड करीत एकूण १३० शेतकºयांना मान्यवरांच्याहस्ते पोळ््याचे साहित्य वाटप करण्यात आले. गेल्या दीड महिन्यांपासून महेश ठाकूर, ललित अमोदेकर, पियूष गांधी यांनी गावा-गावात जावून सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका आदींकडून गरजू शेतकºयांची माहिती घेत ही निवड केल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. या साहित्यामध्ये दोर, नाथ, बोरखी, गोंडे, गेठे प्रत्येकी दोन व एक सुताची लट असे साहित्य वाटप करण्यात आले.

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी