शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

वादानंतरच्या ‘सेटींग’ ला जळगाव डिवायएसपींनी लावला चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 12:01 IST

गेल्या काही दिवसापासून शहरात दोन गटात वाद होऊन त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वादातून सरकारी व खासगी मालमत्तांचे नुकसान, समाजाला वेठीस धरणे, पोलीस यंत्रणांची दमछाकही होते. इतके सारे झाल्यानंतर दोन्ही गटात तथाकथिक पुढा-याची एन्ट्री होऊन प्रकरणे आपसात मिटविण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी स्वत: पुढाकार घेऊन सरकारच्यावतीने पोलिसांनाच फिर्याद द्यायची पध्दत सुरु केली.

ठळक मुद्देपोलीसच होताहेत फिर्यादी दोन प्रकरणात दाखल झाले गुन्हे गुंडगिरीला आळा घालण्यासाठी निर्णय

सुनील पाटीलआॅनलाईन लोकमतजळगाव : गेल्या काही दिवसापासून शहरात दोन गटात वाद होऊन त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. अनेक प्रकरणात प्राणघातक हल्ला झालेला आहे. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वादातून सरकारी व खासगी मालमत्तांचे नुकसान, समाजाला वेठीस धरणे, पोलीस यंत्रणांची दमछाकही होते. इतके सारे झाल्यानंतर दोन्ही गटात तथाकथिक पुढाºयाची एन्ट्री होऊन प्रकरणे आपसात मिटविण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी स्वत: पुढाकार घेऊन सरकारच्यावतीने पोलिसांनाच फिर्याद द्यायची पध्दत सुरु केली. दोन गटात तेढ असो की गुन्हेगारी कारवाया असो गुन्हा करुन नंतर माफी मागायची, त्यासाठी यंत्रणा व समाजाला वेठीस धरायचे ही पध्दतच समाजासाठी घातक आहे. पोलीस सरकारी फिर्यादी होऊ लागल्याने गुन्हा करणाºयांची हिंमतच होऊ नये, अशा प्रकारांना ब्रेक लागावा या हेतूने सांगळे यांनी घेतलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. न्यायालयीन तारखांना कर्मचाºयांना हजेरी लावावी लागणार असली तरी गुन्हेगारीच्या घटनांना नक्कीच यामुळे आळा बसेल. नुकतेच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन गटात हाणामारी झाली होती. या घटनेत शस्त्रही बाहेर निघाले होते. काही जण जखमी झाले होते. या प्रकरणात  पुढाºयांनी पुढाकार घेऊन जखमी तरुण व कुटुंबाची समजूत घालून पोलिसात तक्रार न देण्याबाबत राजी केले होते. दोन दिवस या प्रकरणात कोणीच फिर्याद दिली नाही. इतकी मोठी घटना व रात्रभर तणावाची स्थिती असताना फिर्याद द्यायला कोणीच पुढे न आल्याने सांगळे यांनी एका सहायक फौजदारलाच फिर्याद द्यायला लावले. बहुतांश प्रकरणात वरवर वाद आपसात मिटविले असले तरी त्यात फिर्याद न देण्यासाठी धमक्या देण्यात आल्याचे प्रकार उघडकीस झाले आहेत. पोलीस फिर्यादी होत असल्याने गुंडगिरीला नक्कीच आळा बसेल अशी आशा आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा