भारनियमनाच्या असह्य चटक्यांनी जळगावकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:11 PM2017-10-06T23:11:11+5:302017-10-06T23:15:37+5:30

परीक्षा, सणासुदीच्या काळातील संकटाने संताप

Jalgaon distrube with unbearable power cuts of weight | भारनियमनाच्या असह्य चटक्यांनी जळगावकर हैराण

भारनियमनाच्या असह्य चटक्यांनी जळगावकर हैराण

Next
ठळक मुद्दे सर्व नऊ ग्रुपच्या फिडरवर भारनियमनदोन तासापासून ते साडेनऊ तास भारनियमन

ऑनलाईन लोकमत 

जळगाव, दि. 6 - पावसाचे कमी प्रमाण, वीज निर्मितीचे काही संच बंद पडल्याने वीज निर्मितीमध्ये घट येऊन भारनियमनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातीलही सर्वच नऊ ग्रुपच्या फिडरवर  भारनियमन केले जात असून ऐन ‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्यात दोन तास ते साडे नऊ तासाच्या भारनियमनामुळे शहरवासीय होरपळून निघत आहे. 
विजेच्या पुरवठय़ापेक्षा मागणी वाढल्याने राज्यभर  भारनियमन करण्यात येत आह़े त्यानुसार शहरातही भारनियमन वाढले आहे.  अनेक संच बंद पडल्याने वीज निर्मितीवर मोठा परिणाम होऊन  भारनियमन कक्षाकडून  परिमंडळ कार्यालयांना कुठे व किती तास भारनियमन करावे, याबाबत आदेश देण्यात आले आहे.  

सर्व फिडरवर भारनियमन
यापूर्वी शहरात ज्या ठिकाणी वीजचोरी जास्त आहे व वसुली कमी आहे, अशाच ठिकाणी आपत्कालीन भारनियमन केले जात असे. यामध्ये शहरातील फिडरचे नऊ ग्रुप तयार करण्यात आले आहे. यामध्ये ग्रुप ई, एफ, जी-1, जी-2 या ग्रुपवर हे भारनियमन होत असे. मात्र आता या ग्रुपसह कधीतरी भारनियमन होणा:या ए ते डी ग्रुपमधील फिडरवरदेखील भारनियमन केले जात आहे. 

नागरिक घामाघूम
सध्या ऑक्टोबर हिटचा चांगलाच तडाखा जाणवत असून या उकाडय़ामुळे नागरिक हैराण आहेत. त्यात भरात भर म्हणजे भारनियमनामुळे घरात बसणे कठीण झाले आहे. यामध्ये लहान बालकांनाही जास्त त्रास होत आहे. दुपारी, संध्याकाळी होणा:या भारनियमनामुळे नागरिक घामाघू होत आहेत. 

परीक्षेच्या काळातील भारनियमनाने विद्याथ्र्यानाही फटका
सध्या परीक्षेचा काळ असल्याने अनेक शाळांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत तर काहींच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. ऐन परीक्षेच्या काळातील भारनियमनामुळे अभ्यासावर परिणाम होत असल्याने विद्यार्थी व पालकही चिंतीत झाले आहेत. 

सणासुदीत अंधाराने संताप
ऐन सणासुदीचा काळ जवळ येत असल्याने व भारनियमन वाढत असल्याने नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. सध्या सुरू असलेले भारनियमन ऐन प्रकाशपर्व, दिवाळीच्या दिवसातही सुरू राहण्याच्या शक्यतेने शहरवासीय चिंतीत झाले आहेत. 

रुग्णांना असह्य वेदना
सध्या शहरात डेंग्यू व इतर आजाराचे रुग्ण असल्याने त्यांनाही याचा फटका बसत आहे. वाढता उकाडा व त्यात भारनियमनामुळे डेंग्यूचे रुग्ण तळमळत आहे. शहरातील रुग्णालयामध्येही हीच स्थिती असून जनरेटरवर जास्त भार शक्य होत नसल्याचे चित्र आहे. 

संपूर्ण शहरात भारनियमन
 यापूर्वी ई फिडरवरील शास्त्री टॉवर, भवानीपेठ, नवीपेठ, फुले मार्केट,  एफ फिडरवरील  संत मीराबाई नगर,  ज़ेडी़सी़सी बँक कॉलनी परिसर, जिल्हापेठ परिसर, सिंधी कॉलनी, सालार नगर, कासमवाडी,  बळीरामपेठ, रथचौक, सुभाष चौक, जिल्हा परिषद, शनिपेठ या भागात  भारनियमन  केले जात होते. मात्र आता सर्वच्या सर्व नऊ ग्रुपमधील फिडरवर भारनियमन केले जात आहे. 

नागरिकांनी दिले निवेदन
वाढत्या भारनियमनाच्या पाश्र्वभूमीवर तसेच नागरिकांना होणा:या त्रासासंदर्भात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला महानगराध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, अशफाक पिंजारी, डॉ. सुषमा चौधरी, डॉ. शरीफ बागवान, फहीम पटेल, रऊ फ शेख, सैयद आबिद अली, वैशाली झाल्टे आदींनी महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी यांना निवेदन दिले व भारनियमन बंद करण्याची मागणी केली. 

औद्योगिक वसाहतीलाही झळ
औद्योगिक वसाहत परिसरातही दररोज अचानक एक ते दीड तास वीज गायब होत आहे. येथे भारनियमन नसले तरी काहीही न कळविता वीज गेल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. डाळ उद्योगाचा विचार केला तर प्रक्रियेसाठी माल मशिनमध्ये टाकलेला असताना अचानक वीज गेल्यास तो अडकून राहतो व पुन्हा काढण्यास मोठा वेळ जातो. सोबतच कामगार, मजूर बसून राहत आहे.  एकूणच डाळ उत्पादनावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

असे आहे भारनियमन
- ग्रुप ए -  तीन तास 15 मिनिटे
- ग्रुप बी - चार तास
- ग्रुप सी - चार तास 45 मिनिटे
- ग्रुप डी - पाच तास 30 मिनिटे
- ग्रुप ई - सहा तास 15 मिनिटे
- ग्रुप एफ - सात तास
- ग्रुप ई 1 - सात तास 45 मिनिटे
- ग्रुप जी 1 - आठ तास 30 मिनिटे
- ग्रुप जी 2 - नऊ तास 15 मिनिटे

हे सर्व भारनियमन दररोज सकाळी सहा ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत वेगवेगळ्य़ा वेळेनुसार दोन टप्प्यात केले जात आहे. 

वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार भारनियमन केले जात आहे. सध्या शहरातील नऊ ग्रुपवरील फिडरवर दोन तास ते साडेनऊ तास भारनियमन केले जात आहे.
- संजय तडवी, कार्यकारी अभियंता, महावितरण.

अचानक एक ते दीड तास वीज जात असल्याने कामगार, मजूर बसून राहतात व काम ठप्प होऊन उत्पादनावर परिणाम होत आहे. 
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन. 

Web Title: Jalgaon distrube with unbearable power cuts of weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.