शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्याचे ‘आरोग्य’ चिंताजनक, रिक्त पदांचे अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 12:41 IST

दोन्ही मंत्र्यांसह माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात बिकट स्थिती

ठळक मुद्देरुग्णालयांच्या स्थापनेपासून एकाही ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक नाहीउपजिल्हा रुग्णालयातही स्थिती वाईट

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ११ - जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागत नसल्याचे चित्र असून जिल्ह्यातील एकाही रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल कायम आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांसह माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात अधिक बिकट स्थिती असल्याचे चित्र आहे. वैद्यकीय अधिकाºयांचे रिक्त पदांचे अर्धशतक झाले असून आरोग्याच्या बाबतीत चिंताजनक स्थिती आहे.जळगाव येथील जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर आरोग्य विभागाचे जिल्ह्यात आता एकूण २० रुग्णालय आहे. मात्र एकाही ठिकाणी वैद्यकीय अधिकाºयांच्या जागा पूर्ण भरलेल्या नाही. या विषयावरुनच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी वैद्यकीय अधिकारी मिळण्याच्या मागणीसाठी थेट उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाच्या माजी मंत्र्यांच्या उपोषणापूर्वीच सत्ताधारी याची दखल घेत वैद्यकीय अधिकारी देतात की खडसे यांना उपोषणास बसावेच लागेल, या कडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.स्थापनेपासून वैद्यकीय अधीक्षक नाहीजिल्ह्यात सध्या तीन उपजिल्हा रुग्णालय, एक कुटीर रुग्णालय, १७ ग्रामीण रुग्णालय असून या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक हे वर्ग एकचे पद मंजूर आहे. मात्र रुग्णालयांच्या स्थापनेपासून या एकाही ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक न मिळाल्याने हे पद रिक्तच आहे. यामध्ये केवळ १९८७मध्ये धरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या स्थापनेवेळी वैद्यकीय अधीक्षक आले, मात्र ते काही दिवसच येथे राहिले.निम्याहून अधिक पदे रिक्तजिल्ह्यातील १७ ग्रामीण रुग्णालयांसाठी प्रत्येकी तीन अधिकाºयांचे पदे मंजूर आहे. मात्र यामध्ये तब्बल चार ग्रामीण रुग्णालयांमध्ये एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने ही रुग्णालये वाºयावर असल्याचे चित्र आहे. यामध्ये वरणगाव, बोदवड, पाल, पहूर या रुग्णालयांचा समावेश आहे. या सोबतच चाळीसगाव, एरंडोल, यावल, न्हावी, पिपंळगाव हरेश्वर, अमळनेर, अमळगाव येथे पत्येकी १, धरणगाव, रावेर, मेहुणबारे येथे प्रत्येकी दोन अधिकाºयांचे पद रिक्त आहे. केवळ पारोळा, भडगाव येथे तीन अधिकारी आहे, मात्र त्यातही सर्वजण कायमस्वरुपी नसून काही कंत्राटी आहेत. त्यामुळे या १७ ठिकाणी ५१ अधिकाºयांची आवश्यकता असताना २८ पदे रिक्त आहेत.उपजिल्हा रुग्णालयातही स्थिती वाईटजिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालयांध्येही बिकट स्थिती आहे. मुक्ताईनगर येथील ५० खाटांच्या रुग्णालयासाठी ७ अधिकारी पदे मंजूर आहे. येथे चौघांची नियुक्ती आहे, मात्र तीन अनाधिकृतरित्या गैरहजर असल्याने एकाच वैद्यकीय अधिकाºयावर तालुक्याची व परिसराची मदार आहे. जामनेर येथेही सात पदे मंजूर असून त्यापैकी दोन पदे रिक्त आहेत. चोपडा येथे १४ पदे मंजूर असून १२ अधिकारी कार्यरत आहे तर दोन पद रिक्त आहे.मंत्र्यांच्या मतदारसंघात बिकट स्थितीवैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याच शहरातील जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दोन पदे रिक्त असण्यासह मतदारसंघातील पहूर या मोठ्या व औरंगाबाद मार्गाला लागून असलेल्या ग्रामीण रुग्णालयाला गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी मिळालेलेच नाही. अद्यापही तेथे पद रिक्त असून तेथील रहिवाशांना विना वैद्यकीय अधिकाºयांची सवय झाल्याचे उपहासात्मकपणे म्हटले जात आहे. ठिकठिकाणी आरोग्य शिबिर घेऊन आरोग्यदूत अशी ख्याती असलेल्या व वैद्यकीय खाते संभाळणाºया गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात अशी स्थिती असताना ते याकडे लक्ष का देत नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अशाच प्रकारे आरोग्याच्या प्रश्नावरून नेहमी जिल्हा रुग्णालयात आंदोलन करणारे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव ग्रामीण रुग्णालयातही एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून दोन पदे रिक्त आहे. माजी मंत्र्यांच्या मतदारसंघातील तीन रुग्णालयात एकही अधिकारी नाही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघातील मुक्ताईनगरला सहा वैद्यकीय अधिकाºयांची कमतरता आहे तर बोदवड, पाल, वरणगाव या तीन ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी नाही.कंत्राटी डॉक्टरांना शवविच्छेदनाची परवानगी नाही जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहे. ते उपचार करीत असले तरी शवविच्छेदनाची त्यांना परवानगी नसते व एमएलसीमध्येदेखील अडचणी येतात. त्यामुळे कायमस्वरुपी डॉक्टरांची मागणी होत आहे.जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये बहुतांश रिक्त पदे भरले आहे. डॉक्टरांची आवश्यकता तर आहे, त्यासाठी आहे त्या वैद्यकीय अधिकाºयांना येथून तेथे पाठवून काम भागविले जात आहे.- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.

टॅग्स :JalgaonजळगावHealthआरोग्य