शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

जळगाव जिल्ह्यात इशारा अतिवृष्टीचा अन् दोन दिवसांपासून केवळ रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 12:00 IST

जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम

ठळक मुद्दे हुलकावणी बळीराजाच्या चिंतेत भर

जळगाव : मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी जोरदार पाऊस होत असला तरी जिल्ह्यात पावसाने अद्यापही पाठ फिरविल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून केवळ रिपरिपच सुरू असल्याने बळीराजासह सर्वच चिंतातूर झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलेला असताना केवळ २० ते ३० मि.मी. पावसाची नोंद होत आहे.जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात मुंबई, नागपूर, कोकण सह इतरत्रही जोरदार हजेरी लावणारा पाऊस तर हुलकावणी देतच आहे, सोबतच हवामानाचे अंदाजही चुकत असल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडत आहे. याचा प्रत्यय गेल्या तीन दिवसांपासून येत आहे. जिल्ह्यात ७ जुलैपासून दररोज अतिवृष्टीचा इशारा दिला जात आहे. जोरदार पाऊस होणार असल्याचा आनंद तर अतिवृष्टीने पिकांच्या नुकसानीची चिंता अशा व्दिधा मनस्थितीत बळीराजा होता. अतिवृष्टी तर दूरच जिल्ह्यात जोरदार पाऊसही झाला नाही.अतिवृष्टीचा इशारा असताना प्रत्यक्षात झालेला पाऊसजळगाव तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी १ मि.मी., १० रोजी ०.१ मि.मी., जामनेर तालुक्यात ७ रोजी १.५ मि.मी. ९ रोजी १७.८ मि.मी., १० रोजी ०.९ मि.मी., एरंडोल तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी ० मि.मी., १० रोजी ० मि.मी., धरणगाव तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी ० मि.मी., १० रोजी ० मि.मी., भुसावळ तालुक्यात ७ रोजी ०.५ मि.मी. ९ रोजी ५.८ मि.मी., १० रोजी २.२ मि.मी., यावलतालुक्यात ७ रोजी २.१ मि.मी. ९ रोजी २.६ मि.मी., १० रोजी ० मि.मी., रावेरतालुक्यात ७ रोजी १४.१ मि.मी. ९ रोजी ६.४ मि.मी., १० रोजी ९ मि.मी., मुक्ताईनगर तालुक्यात ७ रोजी ०.५ मि.मी. ९ रोजी ३१.० मि.मी., १० रोजी ११ मि.मी., बोदवड ०.३ तालुक्यात ७ रोजी ०.३ मि.मी. ९ रोजी ४९.७ मि.मी., १० रोजी २.७ मि.मी., पाचोरा तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी २.३ मि.मी., १० रोजी ० मि.मी., चाळीसगाव १.९ तालुक्यात ७ रोजी १.९ मि.मी. ९ रोजी ५.१ मि.मी., १० रोजी ० मि.मी., भडगाव तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी ६ मि.मी., १० रोजी ० मि.मी., अमळनेर तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी ० मि.मी., १० रोजी ०.१ मि.मी., पारोळा तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी २.२ मि.मी., १० रोजी ० मि.मी., चोपडा तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी ०.४ मि.मी., १० रोजी ०.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये तर अनेक तालुक्यांमध्ये पाऊसच नसल्याचे (शून्य मि.मी.) दिसून येते.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव