जळगाव जिल्हयात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण 842 वरून 903वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:14 PM2017-10-15T12:14:47+5:302017-10-15T12:16:02+5:30

जिल्हाधिकारी : बालिका सप्ताहाचा समारोप

In Jalgaon district, the ratio of birthdays of girls is 842 to 903 | जळगाव जिल्हयात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण 842 वरून 903वर

जळगाव जिल्हयात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण 842 वरून 903वर

Next
ठळक मुद्दे बालिका सप्ताहाचा समारोपघोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धांचे आयोजनलिंग गुणोत्तरात जळगावचा दुसरा क्रमांक

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 - देशात मुलींची संख्या दिवसेदिवस कमी होत चालली असताना जळगाव जिल्हयात मात्र मुलींच्या जन्मदराचे प्रमाण 842 वरून 903 इतके होणे गौरवास्पद असून आशा कर्मचारी व अंगणवाडी सेविकांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे जनजागृती केल्याने हे शक्य होत असल्याचे  गौरोवोद्गार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी काढले. लिंगनिदान होवू नये यासाठी सोनोग्राफीचे कायदे कडक करण्यात आले आहे. यापुढेही सर्वांनी सामाजिक भावनेतून काम करुन समाजात जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही आवाहन त्यांनी या वेळी केले.  
 ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेतंर्गत बालिका सप्ताहाचा समारोप  नियोजन भवनात जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या उपस्थितीत झाला, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर ललित कोल्हे, आमदार सुरेश भोळे,  पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा परिषदेचे उप मुख्यकारी अधिकारी तडवी, तहसीलदार अमोल निकम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, सरस्वती बागूल आदी उपस्थित होते.

निंबाळकर पुढे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला असता 2015 मध्ये लिंग गुणोत्तरात जळगावचा दुसरा क्रमांक होता. त्यावेळी जिल्हयात 1 हजार मुलांच्या तुलनेत 842 मुली जन्माला येत होत्या. मात्र आता हे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब असल्याचे ते म्हणाले.  या योजनेची समाजात जनजागृती करुन मुलं-मुलींमधील लिंग गुणोत्तराचे प्रमाण वाढविण्यासाठी काम करणा:या अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी या सर्व समाजासाठी देवदूत असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. 

आमदार सुरेश भोळे म्हणाले की, मुलगी वाचली तरच देश वाचेल या भावनेतून आपण सर्वजण  काम  करु या, असे आवाहन केले.
9 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत बालिका सप्ताहा साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेंतर्गत  प्रशासनातर्फे घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती  काटकर यांनी प्रास्ताविक भाषणात दिली.
 सुरुवातीस बेटी बचाओ बेटी पढाओ अशी  प्रतिज्ञा घेऊन या मोहिमेच्या फलकावर मान्यवरांनी  स्वाक्षरी केली. त्यानंतर विनोद ढगे व त्यांच्या सहका:यांतर्फे याबाबत पथनाटय़ सादर केले.  

 

Web Title: In Jalgaon district, the ratio of birthdays of girls is 842 to 903

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.