शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात वाढले २० हजार ७७८ मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 12:38 IST

विधानसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी जाहीर

जळगाव : लोकसभा निवडणूक होताच आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी अंतिम मतदार यादी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. लोकसभा निवडणुक झाल्यानंतर जिल्ह्यात २० हजार ७७८ मतदारांची वाढ झाली असून त्यामुळे आता जिल्ह्यातील मतदारांची संख्या ही ३४ लाख ४७ हजार १८४ पर्यंत पोहोचली आहे़विधानसभा निवडणुकीचा बिगुल लवकरचवाजणार आहे़ त्यामुळे निवडणूक विभागाने मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविले होते़ या अभियानात नवोदित मतदारांसोबत सुटलेल्या मतदराची नावे नोंदविण्यात आली़ दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी १९ आॅगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येणार होती़ मात्र, नंतर यास राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली होती़ अखेर मतदरांची अंतिम यादी शनिवारी प्रसिध्द करण्यात आली़ दरम्यान, जिल्ह्यात एकूण २० हजार ७७८ मतदारांची नावे नव्याने मतदान यादीत समाविष्ट करण्यात आली आहे़ आता जिल्ह्यातील मतदारांचा आकडा ३४ लाख ४७ हजार १८४ वर पोहोचला आहे़१७९६३५० पुरूष तर १६५०७४१ महिला मतदारशनिवारी अकरा मतदार संघांतील मतदारांची आकडेवारी प्रसिध्द झाली असून यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी यंदा जिल्ह्यात १७ लाख ९६ हजार ३५० पुरूष मतदार आहेत तर १६ लाख ५० हजार ७४१ महिला मंतदारांचा समावेश आहेत़ तर ९३ तृतीयपंथी बांधव मतदारांचा समावेश आहेत़ सन २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ३१ लाख २५ हजार ११६ मतदार होते़ ते गेल्या पाच वर्षात या मतदारसंख्येत ३ लाख २२ हजार ६८ ने वाढ झाली आहे़ आताची मतदारसंख्या ही ३४ लाख ४७ हजार १८४ आहे़३ हजार ५३२ केंद्रविधानसभा निवडणुकीसाठी यंदा ३ हजार ५३२ मतदान केंद्र असणार आहे़ त्यामुळे आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे़ तश्या हालचाली सुध्दा सुरू झाल्या आहेत़बीएलओंशी संपर्क साधावामतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी आपले मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. नावे नसल्यास त्यांनी त्यांच्या भागातील बीएलओंशी संपर्क साधावा किंवा डब्ल्यूूडब्यूडब्ल्यू.एनव्हीएसपी.इन या वेबसाइटवर जाऊन फॉर्म नंबर सहा भरावा. त्वरित नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार वैशाली हिंगे यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव