शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा रुग्णालयात दर महिन्याला दाखल होतात अपघाताचे ३५० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 12:04 IST

फ्रॅक्चरचे प्रमाण अधिक

जळगाव : जिल्ह्यातील रस्ते अपघातात रोज १० ते १५ तर महिन्याला ३५० च्या जवळपास रुग्ण जखमी होत असतात. पर्यायाने ते जिल्हा रुग्णालयात दाखल होत असतात. खासगी रुग्णालयांमधील संख्यादेखील जवळपास सारखीच आहे. साधारण एकट्या शहरातील रुग्णालयात अपघाताचे एक हजाराच्या जवळपास रुग्ण महिनाभरात दाखल होत असतात.जिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण हे संपूर्ण जिल्ह्यातील असले तरी जवळपासचे गावे तसेच शहरातील महामार्गावरील अपघाताचेच अधिक असतात. यात डोक्याला मार लागणे, हाता-पायाला खरचटणे व फ्रॅक्चर अशा स्वरुपाचे रुग्ण जास्त आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वच प्रमुख रस्त्यांचे कामे सुरु असल्याने त्या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.दुचाकी घसरुन जखमी होण्याच्या सर्वाधिक घटना आहेत. यात विशेष म्हणजे दाम्पत्यांची संख्या देखील मोठी आहे. जिल्हा रुग्णालयात रविवारी व शनिवारी अपघाताचे रुग्ण जास्त येत असल्याची माहिती अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी दिली.जिल्हा रुग्णालयात बुधवारी दुपारी २ ते ४ या दोन तासात रस्ता अपघाताचे २ रुग्ण तर हाणामारीचे ७ व सर्पदंशाचे २ व इतर ३ असे १४ रुग्ण दाखल झाले होते. दिवसाला एकूण ५०० रुग्ण दाखल होतात, त्यापैकी किमान १५ रुग्ण अपघाताचे असतात. सर्पदंश, श्वान दंश, विषबाधा तसेच प्राण्यांचा हल्ला अशा स्वरुपाचे रुग्ण दुपारनंतर दाखल होत असल्याची माहिती केस पेपर विभागातून मिळाली.खासगी रुग्णालयात ५ टक्कयांनी रुग्ण वाढलेगेल्या काही महिन्यापासून खासगी रुग्णालयात अपघाताचे रुग्ण येण्याच्या संख्येत ३ ते ५ टक्के वाढ झाली असल्याची माहिती मालती हॉस्पिटलचे आर्थोपेडीक डॉ.प्रताप जाधव यांनी दिली. जामनेर, अमळनेर, एरंडोल या भागातील रुग्ण शाहू नगरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होतात. हात व पाय फ्रॅक्चर असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती डॉ.राजेश पाटील यांनी दिली. महिन्याला १५० च्या जवळपास रुग्ण अपघाताचे येत असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.जिल्हा रुग्णालयातच होतात शस्त्रक्रियाआर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या गरीब रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. महिन्याला अपघाताच्या किमान ५० रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. काही रुग्ण प्राथमिक उपचारानंतर खासगी दवाखान्यात जातात. इतर तालुक्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण जिल्हा रुग्णालयात हलविले जातात, अशा रुग्णांची संख्या महिन्याला १५० च्याजवळपास आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव