शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ३२३ मिलीमीटर पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 20:59 IST

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असून हा पाऊस जिल्ह्यातील पिकांना जीवदान ठरत आहे. अनेक दिवसांच्या ...

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असून हा पाऊस जिल्ह्यातील पिकांना जीवदान ठरत आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५०़५४ टक्के इतका पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे़दरम्यान, जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६२८़२२ मिलीमीटर इतके असून मागील वर्षी २० जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या २२़७८ टक्के म्हणजेच १४५़२२ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी ३२२़५९ मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ५०़५४ टक्के इतका पाऊस पडला आहे.सर्वाधिक पाऊस अमळनेर तालुक्यातजिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आतापर्यंत सर्वाधिक ६९़७४ टक्के इतका पाऊस अमळनेर तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच ४०़६९ टक्के पाऊस भुसावळ तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात २० जुलै रोजी एका दिवसात ५़६९ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात झालेला पाऊसजळगाव तालुका- ३४२़७२ मिलीमीटर (५०़८६ टक्के), जामनेर- ३२३.३० मि.मी., (४६़९५), एरंडोल- २८४़५० मि.मी. (४७़१५), धरणगाव - ३०७़८३ मि.मी. (४५़३७), भुसावळ - २४४़६० मि.मी. (४०़६९), यावल - २८२़५ मि.मी. (४३़८९), रावेर - ३१८़४३ मि.मी. (४९़२७), मुक्ताईनगर - २९७़३० मि.मी. (५२़०८), बोदवड - २७४़५८ मि.मी. (४०़८४), पाचोरा - ३३०़४६ मि.मी. (५१़२२), चाळीसगाव - ३५६़३२ मि.मी. (५५़८८), भडगाव - ३३५ मि.मी. (५१़८३) अमळनेर - ४१०़६० मि.मी. (६९़७१), पारोळा - ३०२़१० मि.मी. (४८़७४), चोपडा - ४२९़०६ मि.मी. (६५ टक्के) याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या ५०़५३ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव