शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

जळगाव जिल्ह्यात २७७४ कोटींचे मुद्रा लोन तरी तरुणांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:27 IST

आकडेवारीबाबत संशय

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजीलाभार्थी निवडूनच दिला जातोय लाभ

जळगाव : गेल्या साडेतीन वर्षात ५ लाख ४४ हजार अर्जदारांना २ हजार ७७४ कोटी ८९ लाखांचे मुद्रा लोन वाटप करण्यात आले असल्याचा दावा बँकांकडून केला जात असला तरीही प्रत्यक्षात यात बनवाबनवी होत असून जुन्या मर्जीतील कर्जदारांनाच मुद्रालोनचा लाभ देण्याचे अथवा अन्य प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. कर्जवाटपाची व लाभार्थ्यांची आकडेवारी मात्र फुगलेली दिसत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत मुद्रालोन वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लाभार्थ्यांच्या याद्या देखील सादर करण्याचे आदेश दिले आहेत.सुशिक्षीत बेरोजगारांना नवीन व्यवसाय, स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी बँकांकडून सहजासहजी अर्थसाह्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे शासनाने मुद्रा योजनेद्वारे हे कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच व्यवसाय वृद्धीसाठीही या योजनेतून कर्ज मिळू शकते. मात्र शासन व्याजाचा भार उचलण्याची हमी घेत असतानाही बँकांकडून मात्र मुद्रालोन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बऱ्याचदा तर बँकांकडून उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी व्यवसाय वृद्धीसाठी अथवा मर्जीतील जुन्या कर्जदारांनाच हे मुद्रालोन देऊन व्याजाचा लाभ दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कर्जवाटपाची आकडेवारी व लाभार्र्थींची आकडेवारी फुगलेली दिसते. प्रत्यक्षात लाभ मात्र गरजूंना मिळतच नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमकी हीच बाब हेरून आढावा बैठकीत अधिकाºयांना धारेवर धरले. सरकार व्याजाची हमी घेत असतानाही कर्जवाटपास टाळाटाळ करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत अशा बँक अधिकाºयांवर कारवाईचे आदेशही जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.लाभार्थी निवडूनच दिला जातोय लाभमुद्रा कर्ज योजनेचे नोडल आॅफिसर तथा लीड बँकेचे मॅनेजर अरूण प्रकाश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बँका मुद्रा लोन देताना ते जुन्या कर्जदाराला देऊन आकडेवारी फुगवीत नाही. आम्ही सादर केलेली आकडेवारीही राज्यस्तरावरील आकडेवारीतून काढलेली असून अचूक आहे. फक्त या कर्जाला कुठलेही तारण नसल्याने कर्जफेड न करण्याचे प्रमाण ९०-९५ टक्के असते. त्यामुळे बँका कर्ज देताना योग्य लाभार्थी निवडण्यासाठी अधिक निकष लावतात. ज्याला व्यवसाय करायचा आहे, त्याला हे कर्ज द्यायचे आहे. मात्र बहुतांश अर्जदार हे कर्ज मिळतेय म्हणून अर्ज करीत असतात. ते व्यवसाय करण्याबाबत ठाम नसतात. त्यातून व्यवसाय करण्यासाठीच कर्ज हवे असलेले शोधून त्यांनाच कर्ज दिले जाते.अशी आहे मुद्रा लोनची आकडेवारी२०१५-१६ या वर्षात १ लाख १६ हजार ७५९ खातेदारांना (लाभार्थ्यांना) ८१८ कोटी ९० लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. २०१६-१७ या वर्षात १ लाख ४२ हजार २९ खातेदारांना ९५९ कोटी ५७ लाख रूपये तर २०१७-१८ या वर्षात २ लाख ३ हजार ७९९ खातेदारांना ७१० कोटी २९ लाखांचे तर २०१८-१९ या वर्षात सप्टेंबर अखेर ८२ हजार २११ खातेदारांना २८६ कोटी १३ लाखांचे असे एकूण ५ लाख ४४ हजार ७९८ खातेदारांना २७७४ कोटी ८९ लाखांचे कर्ज (मुद्रा लोन) वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :bankबँकJalgaonजळगाव