शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात नवीन डीवाय.एसपींची नकार घंटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:44 IST

जिल्हा पोलीस दलात गेल्या दोन महिन्यापासून अधिकारी बदलींची प्रक्रिया सुरु झाली आहे. चोपडा उपविभागाचे डीवाय.एसपी सदाशिव वाघमारे यांची दोन महिन्यापूर्वी बदली झाली. त्यांच्या जागी आयपीएस सौरभ कुमार अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर जळगाव उपविभागाचे डीवाय.एसपी सचिन सांगळे यांचीही लातूर शहर उपविभागात बदली झाली. आर्थिक गुन्हे शाखेतही शासनाने आता स्वतंत्र डिवाय.एसपीची नियुक्ती केली आहे. जळगाव येथे संजय सांगळे यांची नियुक्ती झाली. मात्र नियुक्तीनंतर ते हजरच झाले नाहीत.

ठळक मुद्देविश्लेषण चार डीवाय.एसपींची पदे रिक्तप्रभारीवर हाकला जात आहे गाडा

सुनील पाटीलजळगाव : जिल्हा पोलीस दलात गेल्या दोन महिन्यापासून अधिकारी बदलींची प्रक्रिया सुरु झाली आहे. चोपडा उपविभागाचे डीवाय.एसपी सदाशिव वाघमारे यांची दोन महिन्यापूर्वी बदली झाली. त्यांच्या जागी आयपीएस सौरभ कुमार अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर जळगाव उपविभागाचे डीवाय.एसपी सचिन सांगळे यांचीही लातूर शहर उपविभागात बदली झाली. आर्थिक गुन्हे शाखेतही शासनाने आता स्वतंत्र डिवाय.एसपीची नियुक्ती केली आहे. जळगाव येथे संजय सांगळे यांची नियुक्ती झाली. मात्र नियुक्तीनंतर ते हजरच झाले नाहीत.जळगाव गृह डीवाय.एसपी रशीद तडवी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही. चोपडा, व आर्थिक गुन्हे शाखा येथे डीवाय.एसपींची नियुक्ती होऊनही हे दोन्ही अधिकारी अद्याप रुजू झालेले नाहीत तर जळगाव येथे सांगळे यांच्या जागी अद्यापही कोणाची नियुक्ती झालेली नाही. नवीन नियुक्ती नसल्याने सांगळे यांनाही सोडण्यात आलेले नाही. होम डीवाय.एसपींचा पदभार पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्याकडे देण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचाही पदभार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्याकडे आहे. गेल्या काही वर्षातील पोलीस दल व राजकीय घडामोडी पाहता जळगाव जिल्ह्यात नवीन अधिकारी यायला उत्सुक नाहीत. आजच्या स्थितीत चार डिवाय.एसपींची पदे रिक्त आहेत. ज्या अधिका-यांनी जिल्ह्यात यापूर्वी काम केले आहे, ते अधिकारी मात्र पुन्हा जळगावात येण्यात उत्सुक आहेत. जळगाव डीवा.एसपीसाठी चाळीसगावचे तत्कालिन डीवाय.एसपी अरविंद पाटील व विद्यमान डीवाय.एसपी नजीर शेख यांच्या नावाची चर्चा आहे. क्रिम पोस्ट म्हटली म्हणजे त्या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप आलाच, त्यामुळे राजकीय नेत्यांच्या मर्जीशिवाय महत्वाच्या ठिकाणी नवीन अधिका-याची नियुक्ती होऊ शकत नाहीत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे कडक शिस्तीचे अधिकारी असल्याने येथे नवीन अधिकारीही येण्यास धजावत नाही. चोपड्याला नियुक्त झालेले आयपीएस अधिकारी सौरभकुमार अग्रवाल यांचीही हजर होण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी