शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून वाळूचे २ डंपर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:31 IST

‘महसूल’चा धाक संपला

ठळक मुद्देपोलिसात गुन्हा दाखलजप्त वाहन पळविण्याची तिसरी घटना

जळगाव :तहसीलदारांनी सोमवारी राबविलेल्या तपासणी मोहीमेत विना पावती आढळलेले तीन डंपर सोमवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले होते. त्यातील दोन डंपर रात्रीच पळवून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी निदर्शनास आला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल विभागाचा वाळू माफियांवरील धाक संपला असल्याचे स्पष्ट झाले आहे.कानळदा परिसरातून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना सोमवारी १७ रोजी सायंकाळी कानळदा-जळगाव रस्त्यावर लोकांनी अडविले होते. याबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार आल्याने जिल्हाधिकाºयांच्या सूचनेवरून तहसीलदार अमोल निकम यांनी घटनास्थळी जाऊन २० डंपर पकडून दूध फेडरेशनपर्यंत आणले होते. तेथे कागदपत्रांची तपासणी केली असता १७ डंपरचालकांजवळ अधिकृत पावती आढळून आली. तर ३ डंपर चालकांजवळ पावती नसल्याने वाळू भरलेले ते डंपर जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले होते. त्यातील एम.एच.१९ बी.एम.५६५६ व एम.एच.१९ सी.वाय.७५५२ या क्रमांकाचे दोन डंपर पळवून नेल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला.जप्त वाहन पळविण्याची तिसरी घटनाकारवाई करून जप्त केलेले वाहन तहसील अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून पळवून नेण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून गेटचे कुलूप तोडून वाहने पळवून नेण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर वाहने जप्त करून संबंधीतांना अटकही करण्यात आली. तर मागच्याच आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून डंपर पळवून नेण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करून संबंधीतास अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ ही तिसरी घटना सोमवारी रात्री ते मंगळवारी सकाळ या दरम्यान घडली आहे. तर कारवाई करतानाच अधिकाºयांच्या ताब्यातून वाहन पळवून नेण्याचे अनेक प्रकार घडले आहेत.दंड टाळण्यासाठी शक्कलनवीन वाळू धोरण ३ जानेवारी १८ पासून लागू केल्याने. अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन जर पकडले तर ते वाहन ट्रॅक्टर असल्यास त्यास १ लाख रूपये अधिक वाळूचे २० हजार असा १ लाख २० हजार रूपये दंड तर डंपरला २ लाख ५० हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे दंड टाळण्यासाठी जप्त वाहन पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव