शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 11:57 IST

विकास सोसयटी संचालकांना दिलासा, शेतकरी कर्जमाफी योजनेस बाधा येऊ नये म्हणून निर्णय

जळगाव : जिल्हा सहकारी बँकेची होऊ घातलेली निवडणूक आता तीन महिने पुढे ढकलली असून त्या संदर्भात शासनाने परिपत्रक काढले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कामास विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मार्च नंतर शेतकरी कर्जमुक्त होतील आणि त्यामुळे सोसायट्यादेखील निरंक होतील व थकबाकीदार राहणार नाहीत. परिणामी विकासोचे सदस्य जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्याचा मार्गही यामुळे मोकळा झाला असून त्यांना यामुळे एकप्रकारे दिलासाच मिळाला आहे.जिल्हा बँकेची निवड प्रक्रिया सुरू झाली असून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी ३१ जानेवारी २०२०पर्यंत जिल्ह्यातील विकास सोसायटींचे ठराव मागविण्यात आले आहेत. मात्र ही मुदत पूर्ण होण्यापूर्वीच जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची राज्य सरकारने घोषणा केली. त्यामुळे पुढील हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची कार्यवाही पूर्ण करावी लागणार असल्याने सहकार विभागाने जिल्हास्तरीय क्षेत्रीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व त्यांचे क्षेत्रीय अधिकारी यांचा सहभाग अपेक्षित आहे. यासाठी बहुतांश अधिकारी योजनेच्या अंमंलबजावणीत व्यस्त राहणाह आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला व तसे परिपत्रक २७ जानेवारी रोजी काढण्यात आले.इच्छुकांचा मार्ग मोकळाजर विकासो थकबाकीदार असेल तर त्या संस्थेच्या संचालकांचा ठराव करता येणार नाही. त्याऐवजी थकबाकीदार नसलेल्या सक्रीय सभासदाच्या नावाचा ठराव करता येणार आहे. त्यामुळे थकबाकी असलेल्या विकासोंच्या अनेक इच्छुक संचालकांचा पत्ता कट झाला होता. मात्र मार्चनंतर कर्जमाफीमुळे अनेक संस्था कर्जमुक्त होऊन ‘अ’ वर्गात जाणार आहेत. अशा संस्थांच्या संचालकांना त्यामुळे निवडणुक लढविणे शक्य होणार आहे. आता निवडणूकच तीन महिने पुढे ढकलल्याने इच्छुकांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव