शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसानभरपाई अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचे ३६ टक्के वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:10 IST

भुसावळ व बोदवडमध्ये १०० टक्के वाटप

जळगाव : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीच्या भरपाईपोटी शासनाकडून प्राप्त अनुदानाच्या १७९ कोटी ९८ लाखांच्या पहिल्या हप्त्याच्या रक्कमेपैकी ५७ कोटी २ लाख १२ हजार ७२३ इतक्या रक्कमेचे म्हणजेच ३६.५४ टक्के वाटप बँकांमार्फत झाले आहे. त्यात भुसावळ व बोदवड तालुक्यांचे १०० टक्के अनुदान वाटप झाले आहे. तर जळगाव, एरंडोल व मुक्ताईनगर तालुक्यात शून्य टक्के वाटप झाले आहे.जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले.नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने कृषी विभाग, महसूल व जि.प.ला दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातही पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले. तसेच या नुकसानीपोटी जिल्ह्यासाठी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत जिरायत क्षेत्रासाठी ३१७ कोटी २३ लाख २५ हजार ४९४ रूपये, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत बागायत क्षेत्रासाठी ३०७ कोटी ७१ लाख ४४ हजार ७७५ रूपये तर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत फळपिकांसाठी १८ कोटी ६९ लाख ८२ हजार २० रुपये अशी एकूण ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार २८९ रूपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून २८ टक्के रक्कम म्हणजेच १७९ कोटी ९८ लाख १ हजार रूपये वितरीत केला असून जिल्हा प्रशासनाने हा निधी तालुकानिहाय २८ टक्के प्रमाणे वितरीत केला आहे. त्याचे वाटप बँकांमार्फत सुरू आहे.केंद्र शासनाकडूनही मदतीची मागणी करण्यात आली असून केंद्र शासनाची समितीही २२ व २३ नोव्हेंबर रोजी पाहणी करून गेली आहे.केंद्र शासनाने पहिला हप्ताही जाहीर केला असला तरीही त्याबाबतचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत.मदत वाटप करावयाच्या एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या- ६ लाख ४१ हजार ३४५वितरीत निधी- १७९ कोटी ९८ लाख १ हजारवाटप वितरीत झालेले शेतकरी २ लाख ५४ हजार ७४६वितरीत अनुदान- ५७ कोटी ०२ लाख, १२ हजार ७२३टक्केवारी- ३६.५४ टक्के४६३ कोटी ६६ लाख निधीची अद्याप प्रतीक्षा

टॅग्स :Jalgaonजळगाव