शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:36 IST

पावसाची सरासरी १०६ टक्क्यांवर

जळगाव : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून बुधवारी पाचोरासह परिसरात झालेल्या जोरदार पावसानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्ह्याला पुन्हा पावसाने झोडपले. जळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला.जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार व सलग हजेरी लावल्याने जिल्ह्याची पावसाची सरासरी १०५.७ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील ३ मोठे, १३ मध्यम व ९६ लघुप्रकल्प मिळून एकूण जलसाठा ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र तरीही भोकरबारी, मन्याड या मध्यम प्रकल्पांमध्ये अद्यापही शून्य टक्के तर अग्नावती धरणात १.६३ टक्केच उपयुक्त साठा झाला आहे.जिल्ह्यात यंदा पावसाने तब्बल २३ दिवस उशीराने हजेरी लावली. मात्र त्यानंतर दोन-चार दिवसांचाच खंड वगळता पावसाने सातत्यपूर्ण व जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्याने पावसाची शंभरी पार केली असून आतापर्यंत १०५.७ टक्के पाऊस झाला आहे.११ तालुक्यात सरासरी शंभरीपारजिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ११ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी १०० च्या पुढे गेली आहे. तर उर्वरीत ४ तालुक्यांपैकी चाळीसगाव वगळता अन्य तीन तालुक्यांची सरासरीही ९५ टक्क्यांच्या पुढेच असून परतीच्या पावसात या तालुक्यांमध्येही पाऊस शंभरी गाठण्याची शक्यता आहे. त्यात जळगाव ९५.५ टक्के, धरणगाव ९५.४, तर भडगाव ९५.६ टक्के यांचा समावेश आहे.सर्वात कमी चाळीसगावात तर सर्वाधिक रावेर तालुक्यातचाळीसगाव तालुक्यात जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ८२.६ टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक १२८.९ म्हणजेच १२९ टक्के पाऊस रावेर तालुक्यात झाला आहे. जामनेर तालुक्यात १०७.४ टक्के, एरंडोल ११५.४, भुसावळ ११३.४, यावल ११८.१, मुक्ताईनगर १०६.५, बोदवड १०८.७, पाचोरा १०२.८, अमळनेर १०४.४, पारोळा १०४ तर चोपडा तालुक्यात १०६.५ टक्के पाऊस झाला आहे.धरणांमध्ये एकूण ७९ टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकूण ७८.९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी हाच साठा जेमतेम ५२.३७ टक्के होता.मोठ्या प्रकल्पांसोबत मध्यम प्रकल्पही समाधानकारक पाणीसाठाजिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ८६.०३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत केवळ ६०.२४ टक्के पाणीसाठा झाला होता. यंदा हतनूरमध्ये ६१.१८ टक्के, गिरणात १०० टक्के तर वाघूर धरणात ८२.१० टक्के पाणीसाठा झाला आहे. अद्यापही या धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच असल्याने उर्वरीत दोन्ही मोठ्या प्रकल्पांमध्येही १०० टक्के पाणीसाठा होण्याची अपेक्षा आहे.दोन मध्यम प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठाजिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावलेली असतानाही भोकरबारी व मन्याड धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा असून अग्नावती धरणात १.६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव