शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मनपा उपायुक्तांच्या गळयात बटाट्याची माळ घालण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 19:06 IST

वृक्ष प्राधिकरण बैठकीतील प्रकार : राजीनामा देऊनही अजेंडा पाठविल्याने मनसे नगरसेवकाचा नाराजीतून प्रयत्न

ठळक मुद्देवृक्ष प्राधिकरण समिती सभेच्या प्रारंभीच सदस्य झाले आक्रमकयापूर्वी दोन वेळी समितीची बैठक झाली होती तहकुबउपायुक्तांच्या गळ्यात बटाट्याची माळ घालण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१२ : वृक्ष प्राधिकरण समितीची सभा वारंवार तहकुब होणे, राजीनामा देऊनही सभेला बोलावणे या प्रकारातून नाराजी झालेले मनसेचे नगरसेवक नितीन नन्नवरे यांनी उपायुक्त चंद्रकांत खोसे यांच्या दालनात जाऊन त्यांच्या गळ्यात बटाट्याची माळ घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार, दि.१२ रोजी दुपारी घडली.महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीची सभा मंगळवारी दुपारी १२ वाजता तेराव्या मजल्यावर उपायुक्त चंद्रकांत खोसे यांच्या दालनात आयोजिण्यात आली होती.यावेळी समितीतील सदस्य पृथ्वीराज सोनवणे व राजीनामा दिलेले सदस्य नितीन नन्नवरे हे ११ वाजून ४५ मिनिटांपासून उपायुक्त तथा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खोसे यांच्या दालनाबाहेर आले होते. यावेळी खोसे यांच्या दालनाला कुलूप असल्यामुळे सदस्य बाहेर बसून होते.यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक ५ डिसेंबर रोजी आयोजिण्यात आली होती. बैठकीस सदस्य १५ मिनिटे उशिरा आल्याने उपायुक्त खोसे यांनी ही सभा तहकुब करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी उपस्थित सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तर सभा असल्याने कामे सोडून मनपात आलेल्या मनसेचे नगरसेवक नितीन नन्नवरे यांनी त्याच वेळी वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा खोसे यांच्याकडे सुपूर्त केला होता. अन्य सदस्यांनीही नाराजी व्यक्त करून राजीनाम्याचा इशारा दिला होता.मंगळवारी तिसºया वेळी ही तहकुब सभा आयोजिण्यात आली होती. त्यावेळी अधिकारी उशिरा आले तर केवळ संजय पाटील हे एकच प्रभाग समिती अधिकारी उपस्थित होते.उपायुक्त आल्यानंतर त्यांच्या दालनात सदस्य गेले. यावेळी नितीन नन्नवरे यांनी मी राजीनामा दिला असताना पुन्हा बैठकीचे निमंत्रण का दिले? अशी विचारणा करत त्यांनी बटाट्याची माळ उपायुक्त खोसेंच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला. खोसे यांनी नन्नवरे यांचे दोन्ही हात पकडून त्यांना खाली बसण्याची सूचना केली. मात्र ते तेथून बाहेर निघून गेले.धमकी दिल्याची तक्रारयावेळी उपायुक्त खोसे हे आपल्याशी एकेरी भाषेत बोलले व ‘असे कृत्य महागात पडेल’ अशी धमकी दिल्याचे माहिती नितीन नन्नवरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रशासन वृक्ष प्राधिकरणाच्या विषयांबाबत गंभीर नसल्यामुळेच आपण राजीनामा दिला होता, असेही त्यांनी सांगितले.

 नितीन नन्नवरे यांचे वर्तन योग्य नव्हते. तरीही आपण संयम सोडला नाही किंवा त्यांच्याशी एकेरीत बोललो नाही. त्यांचा समिती सदस्य पदाचा राजीनामा मंजूर करण्याचे अधिकार आपणास आहेत की नाही? याचा अहवाल मागविला असल्याने राजीनामा मंजूर झाला नाही. त्यामुळे त्यांना बैठकीचा निरोप देण्यात आला होता.- चंद्रकांत खोसे, उपायुक्त.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव