शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात दुचाकीच्या अपघातातील तरुणाला डंपरने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 16:34 IST

दोन दुचाकीच्या धडकेत जमिनीवर कोसळलेल्या बरकत मुस्ताक पाशा (वय,३० रा.गणेशपुरी मेहरुण, जळगाव) या तरुणाला भरधाव वेगाने जाणा-या डंपरने उडविल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता रामानंद नगरातील म्युनिसिपल कॉलनीजवळ घडली. या अपघात तरुण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, अपघात झाल्यानंतर पसार झालेल्या डंपरला नागरिकांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले.

ठळक मुद्दे रामानंद नगरातील घटना   नागरिकांनी पाठलाग करुन पकडले डंपर डंपर चालकाचा पळण्याचा प्रयत्न फसला

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २१ : दोन दुचाकीच्या धडकेत जमिनीवर कोसळलेल्या बरकत मुस्ताक पाशा (वय,३० रा.गणेशपुरी मेहरुण, जळगाव) या तरुणाला भरधाव वेगाने जाणा-या डंपरने उडविल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता रामानंद नगरातील म्युनिसिपल कॉलनीजवळ घडली. या अपघात तरुण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, अपघात झाल्यानंतर पसार झालेल्या डंपरला नागरिकांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बरकत मुस्ताक पाशा हा तरुण बुधवारी हरीविठ्ठल नगरात पीओपीच्या कामासाठी जवळचे नातेवाईक बबलु पाशा यांची दुचाकी (क्र.एम.एच १९ बी.डब्ल्यू २२६९) घेवून जात असताना रामानंद नगरजवळील म्युनिसिपल कॉलनीजवळ मागून येणा-या दुचाकीने (क्र.एम.एच. १९ ए.आर ५७५०) पाशा याच्या दुचाकीला धडक दिल्याने बरकत पाशा रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी गिरणा पंपींगकडे भरधाव वेगाने जाणाºया डंपरने (क्र.एम.एच.१९ झेड ६५६५) पाशा याला धडक दिली. त्यात डंपरच्या पुढील चाकाखाली आल्याने पाशा याच्या तोंडाला, उजव्या पायाला, उजव्या हाताला तर पोटाला गंभीर दुखापत झाली. अपघात होताच पाशा याला लोकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डंपर चालकाचा पळण्याचा प्रयत्न फसलाअपघात झाल्यानंतर डंपर चालकाने तेथून लागलीच पळ काढला. घटनास्थळावर थांबलेल्या लोकांनी या डंपरचा पाठलाग केला. रामानंद नगरच्या उतारवरील दत्त मंदिराजवळ डंपर पकडण्यात आले. डंपर चालक आकाश हिरामण सपकाळे (वय २२) याला जागेवरच लोकांनी चोप दिला. त्यानंतर डंपरसह त्याला रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. डंपर हे शहरातील संजय ढेकळे यांच्या मालकीचे असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा