शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातून शिक्षिकेची सोनसाखळी लांबविणा-या भुसावळच्या महिलेसह दोघं जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 20:23 IST

शिक्षिका सोनल गणेश सोमाणी (वय ३७ रा.भिकमचंद जैन नगर, जळगाव) यांच्या गळ्यातील ७२ हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोनसाखळी लांबविणारी जुलेखा रहिम इराणी व अरबाज इराणी (दोन्ही रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) या दोघांना सुरत येथे पळून जात असतानाच शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली.

ठळक मुद्दे सुरतला पळून जाण्याचा डाव फसला   जळगाव रेल्वे स्थानकावरच पकडले गुन्ह्यातील दुचाकीही हस्तगत

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२० : शिक्षिका सोनल गणेश सोमाणी (वय ३७ रा.भिकमचंद जैन नगर, जळगाव) यांच्या गळ्यातील ७२ हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोनसाखळी लांबविणारी जुलेखा रहिम इराणी व अरबाज इराणी (दोन्ही रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) या दोघांना सुरत येथे पळून जात असतानाच शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली.या दोघांनी सोमवारी दुपारी दीड वाजता भिकमचंद जैन नगरात सोनल सोमाणी यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवून पळ काढला होता. घटना घडल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे विजयसिंग पाटील व प्रितम पाटील यांनी रस्त्यावरील दुकान व कार्यालयांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दुचाकीस्वार अरबाज व जुलेखा सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे व पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तपासासाठी पथक तैनात केले होते.

भुसावळ येथून बसले रेल्वेतगुन्हा घडल्यानंतर शहर पोलिसांनी भुसावळ पोलिसांना संशयिताचे फुटेज व दुचाकीचा क्रमांक पाठविला असता भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुनील सैंदाणे, बाजारपेठचे निलेश बाविस्कर, दीपक जाधव, राहूल चौधरी, प्रशांत चव्हाण व उमाकांत पाटील यांचे पथक दोघांच्या शोधार्थ निघाले. ही दुचाकी रहिम इराणी याची असल्याचे निष्पन्न झाले, मात्र तो कारागृहात असल्याने पोलिसांनी त्याची पत्नी जुलेखाचा शोध घेतला असता जुलेखा व अरबाज हे सोमवारी रात्रीच सुरत जाणाºया रेल्वेत बसले. व ही गाडी जळगावच्या दिशेन रवाना झाल्याची माहिती मिळाली.

जळगाव स्थानकावर सापळा जळगाव शहरच्या सहायक निरीक्षक सारिका कोडापे, सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, संजय हिवरकर, गणेश शिरसाळे, इम्रान अली सैय्यद, मोहसीन बिराजदार, अक्रम शेख, रतन हरी गिते, सादीक शेख, विकास महाजन व गणेश पाटील यांचे पथक ही गाडी जळगाव स्थानकावर पोहचण्याच्याआधी साध्या वेशात तेथे पोहचले. सर्व बोगीत तपासणी केली असता तिसºया क्रमांकच्या बोगीत दोन्हीही आढळून आले. दरम्यान, दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा