शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
7
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
8
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
9
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
10
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
11
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
12
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
13
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
14
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
15
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
16
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
17
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
18
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
19
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
20
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!

१४ महिन्यातच जळगाव शहराच्या मतदानात १२ टक्क्यांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 13:15 IST

रस्ते, जनजागृतीचा अभाव व चिखलामुळे मतदारांची पाठ

अजय पाटील जळगाव : शहरातील रस्त्यांची समस्या, मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीत प्रशासनाला आलेले अपयश व दोन दिवसांपासून शहरात सुरु असलेली पावसाची रिपरिप यामुळे मतदानाच्या टक्केवारीत कमालीची घट झाली आहे. शहरात अंदाजे ४५.१४ टक्के मतदान झाले असून, मनपा निवडणुकीनंतर अवघ्या १४ महिन्यातच शहरातील मतदानाच्या टक्केवारीत १२ टक्क्यांची घट झाली आहे.आॅगस्ट २०१८ मध्ये मनपा निवडणुकीसाठी शहरात ५७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर एप्रिल २०१९ झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४९ टक्के मतदान झाले होते. सहा महिन्याच्या अंतरातच शहरातील मतदानाच्या टक्केवारीत ८ टक्के घट झाली होती. विधानसभा निवडणुकीत स्थानिक उमेदवार शहरातील समस्यांच्या प्रश्न असतो त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी उलट स्थिती दिसून आली. शहरात केवळ ४५.१४ टक्के मतदानाची नोंद झाली असून, लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यातच ४ टक्के घट झाली आहे. केवळ १४ महिन्यांचा अंतरातच शहराच्या मतदानाच्या टक्केवारीत १२ टक्क्यांची घट का झाली ? याबाबत राजकीय पक्ष व प्रशासनाने विचारमंथन करण्याची गरज आहे.मतदानाच्या टक्केवारीत वाढ न होण्याची ही आहेत कारणेगेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची रिपरिप सुरु होती. त्यामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते तसेच वाढीव भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल पसरल्यामुळे पायी चालणेही कठीण होते. त्यामुळे नागरिकांमध्ये निरुत्साह जाणवला. नागरिकांनी मतदान केंद्रापर्यंत जाणे टाळले असावे.अमृत योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश वाट लागली आहे. वर्षभरापासून नागरिक शहरातील खड्डयांच्या समस्येमुळे त्रस्त आहे. खड्डयांचा प्रश्नावर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळाली होती. त्यामुळे अनेकांनी मतदानातून बदल न करता मतदानापासून दुर राहणेच पसंत केल्याचे दिसून येत आहे.प्रत्येक नागरिकाला मतदान करता यावे यासाठी प्रशासनाकडून सोमवारी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती. काही कंपन्यांनीही कामगारांना सुट्टी दिली होती. मात्र, रविवार व सोमवारची सलग सुट्टी आल्यामुळे अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क न बजावता सुट्टीचा आनंद घेतला.बीएलओंवर मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठया पोहचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, मतदारांपर्यंत या चिठ्ठया पोहचल्याच नाहीत. तसेच ज्या चिंठ्ठया पोहचल्या त्यात मतदान केंद्राचे नावच नव्हते. त्यामुळे देखील अनेकांनी मतदानकेंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळाले.मनपा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला होता. त्यामुळे नगरसेवक, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मतदान काढण्यावर अधिक भर देण्यात आला होता.तसेच प्रशासनाकडूनही जागृतीसाठी चांगले प्रयत्न झाले होते. शहराची निवडणूक हवी तशी प्रतिष्ठेची नव्हती. यावेळी नगरसेवकांनीही फार प्रयत्न केले नाहीत.

टॅग्स :Jalgaonजळगाव