शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात आठ वर्षीय बालिकेचा गोणपाटात अर्धनग्न मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:13 IST

समता नगरातील धामणगाववाडा भागातील टेकडीवर बुधवारी सकाळी साडेसहा वाजता अक्षरा उर्फ छकुली नरेश करोसिया (वय ८) या चिमुरडीचा मृतदेह गोणपाटात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या चिमुरडीचा डावा हात व पाय किरकोळ भाजलेला असून गोणपाटात आगपेटी व त्यावर काही तरी लिहिलेले असल्याने हा अघोरीकृत्याचा प्रकार असल्याचा संशय आहे.

ठळक मुद्दे समता नगरातील घटना  अघोरी कृत्याचा संशय अत्याचाराचाही संशय

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१३ : समता नगरातील धामणगाववाडा भागातील टेकडीवर बुधवारी सकाळी साडेसहा वाजता अक्षरा उर्फ छकुली नरेश करोसिया (वय ८) या चिमुरडीचा मृतदेह गोणपाटात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या चिमुरडीचा डावा हात व पाय किरकोळ भाजलेला असून गोणपाटात आगपेटी व त्यावर काही तरी लिहिलेले असल्याने हा अघोरीकृत्याचा प्रकार असल्याचा संशय आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती की, समता नगरातील धामणगाववाड्यात आई मनिषा, भाऊ वर्धन व अंश अशांसह अक्षरा राहत होती. मंगळवारी  गल्लीत खेळत असतानाच सायंकाळी साडे सहा वाजता ती गायब झाली. खेळणे झाले की मुलगी घरी येतेच म्हणून आईने सात वाजेपर्यंत तिची चौकशीच केली नाही. साडे सात वाजेनंतर मात्र तिचा शोध सुरु झाला. संपूर्ण समता नगर व टेकडीवर शोध घेतला, तरीही ती कुठेच आढळून आली नाही. चिंता अधिक वाढल्याने रात्री अकरा वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून मुलगी हरविल्याची तक्रार दिली.समता नगर टेकडी भागात साडेसहा वाजता कचरा फेकायला गेलेल्या एका महिलेला पोत्यात मृतदेह आढळला. रात्री अक्षरा गायब झाल्याची या महिलेला माहिती असल्याने तिने जवळ जावून पाहिले तर तिचाच तो मृतदेह होता. घाबरलेल्या अवस्थेत या महिलेने अक्षराच्या घरी जावून आई मनिषाला माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण गल्ली घटनास्थळी धावली. मुलीचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला.श्वान पथकाने दाखविला माग..घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी सकाळीच घटनास्थळ गाठले. त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानने धामगणगाववाड्याला दोन वेळा माग दाखविला. 

पोलिसांकडून कसून चौकशीया घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, रामानंद नगरचे निरीक्षक बी.जी.रोहोम, उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, प्रदीप चौधरी, गोपनीयचे राजेश पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन आपआपल्या स्तरावर चौकशी करायला सुरुवात केली. काही संशयित लोकांची कसून चौकशी करण्यात आली.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा