शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

जळगाव शहर मतदार संघात उमेदवारांचा ५ लाख ४९ हजार २९८ रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:34 IST

सर्व १३ उमेदवारांनी सादर केला खर्च जळगाव : विधानसभा निवडणूक लढविणारे व माघार घेतलेल्या उमेदवारांनी ११ रोजी निवडणूक खर्च ...

सर्व १३ उमेदवारांनी सादर केला खर्चजळगाव : विधानसभा निवडणूक लढविणारे व माघार घेतलेल्या उमेदवारांनी ११ रोजी निवडणूक खर्च सादर केला. यामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण १३ उमेदवारांचा ९ आॅक्टोबरपर्यंत ५ लाख ४९ हजार २९८ रुपये खर्च झाला असून माघार घेतलेल्या ८ उमेदवारांचा माघारीपर्यंत एक लाख ४ हजार २२ रुपये खर्च झाला आहे. विशेष म्हणजे सर्व उमेदवारांनी खर्च सादर केल्याने या वेळी कोणालाही नोटीस काढण्याची वेळ आली नाही.जळगाव शहर मतदार संघात निवडणूक रिंगणात असलेल्या तसेच माघार घेतलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याविषयी जळगाव शहर मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे यांनी ९ रोजी पत्र काढून ते उमेदवारांना ई-मेल तसेच मोबाईलवर पाठविले होते. त्यात निवडणूक खर्च हिशोब नोंदवही तपासणीसाठी उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी ११ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मनपा इमारतीमध्ये असलेल्या हिशोब शाखेत हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ११ रोजी उमेदवारांचा खर्च सादर होण्यास सुरुवात झाली.यामध्ये भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांचा ९ आॅक्टोबरपर्यंत ३ लाख २८ हजार ५३९ रुपये खर्च झाला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा ५९ हजार १८३ रुपये, वंचित बहुजन आघाडीचे शफी अ.नबी शेख ३० हजार ९४५ रुपये, मनसेचे जमील देशपांडे यांचा २५ हजार ५६० रुपये, अपक्ष उमेदवार शिवराम पाटील यांचा २७ हजार ४५ रुपये, आशीष जाधव यांचा २० हजार ७६० रुपये, बहुजन समाज पक्षाचे अशोक शिंपी यांचा १० हजार ८७३ रुपये, महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वंदना पाटील यांचा १० हजार ७०३ रुपये, अपक्ष ललित शर्मा यांचा १० हजार ४०० रुपये, गोकूळ चव्हाण यांचा ६ हजार ८५० रुपये, अनिल वाघ यांचा ५ हजार ७५० रुपये, माया अहिरे यांचा ५ हजार ३७० रुपये, बहुजन मुक्ती पक्षाचे गौरव सुरवाडे ५ हजार ३२० रुपये असा एकूण १३ उमेदवारांचा ५ लाख ४९ हजार २९८ रुपये खर्च झाल्याची माहिती निवडणूक खर्च हिशोब शाखेतून मिळाली.माघार घेतलेल्या उमेदवारांचा एक लाख ४ हजार २२ रुपये खर्चविधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करून माघार घेतलेल्या आठ उमेदवारांनीही ११ रोजी खर्च सादर केला. यामध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या व माघार घेतलेल्या सीमा भोळे यांचा २२ हजार ५३९ रुपये खर्च झाला आहे. तसेच अपक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचा १४ हजार ८८९ रुपये, डॉ. शांताराम सोनवणे यांचा १४ हजार ६३० रुपये, अ‍ॅड. गोविंद तिवारी यांचा १० हजार ५०० रुपये, अरुण बोरोले यांचा १० हजार ४७४ रुपये, नारायण अग्रवाल यांचा १० हजार ४०० रुपये, चंद्रकांत बेंडाळे यांचा १० हजार ३४० रुपये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शैलेंद्र पाटील यांचा १० हजार २५० रुपये असा एकूण १ लाख ४० हजार २२ रुपये खर्च झाल्याचे सादर करण्यात आले आहे.दुसरी तपासणी १५ रोजीउमेदवारांच्या निवडणूक खर्च नोंदवहीची दुसरी तपासणी आता १५ रोजी होणार असून त्यानंतर १८ आॅक्टोबर रोजी तिसरी तपासणी करण्यात येणार आहे.एकालाही नोटीस नाहीलोकसभा निवडणुकीवेळी वेळेवर खर्च सादर केला जात नसल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनाही नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच खर्च तपासणीला सर्व उमेदवारांचा खर्च सादर करण्यात आल्याने एकाही उमेदवाराला नोटीस देण्याची वेळ आली नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव