शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गणपतीच्या विसर्जनासाठी जळगावला प्रथमच ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’ तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 13:03 IST

गणेशोत्सवात यंदा प्रथमच ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला असून हा फोर्स विसर्जनाच्या दिवशी शहर व अतिसंवेदनशील भागात बंदोबस्तावर असणार आहे.

जळगाव: गणेशोत्सवात यंदा प्रथमच ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला असून हा फोर्स विसर्जनाच्या दिवशी शहर व अतिसंवेदनशील भागात बंदोबस्तावर असणार आहे. दरम्यान, शहरातील विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. अखेरच्या दिवशी १ हजार ५२९ मंडळाकडून जिल्ह्यात ‘श्री’ चे विसर्जन केले जाणार आहे. त्यात १०५ ‘एक गाव एक गणपती’ चा समावेश आहे.

तसेच यंदा जिल्ह्यात २ हजार ३२१ मंडळाकडून ‘श्री’ची स्थापना झाली असून १४१ गावात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. १ हजार ७०२ ठिकाणी सार्वजनिक तर ४७८  ठिकाणी खासगी मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कुठेही अनुसचित प्रकार घडू नये यासाठी प्रथमच विसर्जनाला ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला  असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली.

गणेशोत्सव शांततेत पार पडावा, या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी मुंबई येथून रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स मागविण्यात आला असून त्यात १२० सशस्त्र कर्मचारी आहेत. त्याशिवाय पोलीस प्रशिक्षण केंद्रातील २५ उपनिरीक्षक जालना व धुळे येथून स्वतंत्र २०० जणांचे रिक्रुड (पथक) मागविण्यात आले आहे. दरम्यान, विसर्जन मार्गावर ५२ ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

असे आहेत अखेरच्या दिवशी विसर्जनाचे मंडळ

  • एकुण मंडळ : १५२९
  • सार्वजनिक :११५४
  • खासगी : ३७५
  • एक गाव एक गणपती : १०५

 

असा राहिल बंदोबस्त

  • पोलीस अधीक्षक : १
  • अपर पोलीस अधीक्षक : २
  • उपअधीक्षक : १०
  • पोलीस निरीक्षक : ३२
  • वायरलेस निरीक्षक : २
  • सहायक /उपनिरीक्षक : ९०
  • परिविक्षाधीन उपनिरीक्षक : २०
  • सीआयडी निरीक्षक (पुणे) ५
  • नवप्रविष्ठ शिपाई : २००
  • कर्मचारी : २६००
  • आरसीपी प्लाटून : ८ (एका प्लाटूनमध्ये २९ कर्मचारी)
  • एसआरपी कंपनी : १ (१२० कर्मचारी)
  • होमगार्ड : १८००
  • एसआरपीएफ कंपनी : १ (अमरावती)
  • आरसीपी प्लाटून : ८
  • स्ट्रायकिंग फोर्स : १६ प्लाटून
  • क्युआरटी पथक : १
  • रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स : १२० कर्मचारी
टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिस