शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात उद्योजक पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने तीन मुलांसह स्वत:ला कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:58 IST

गेल्या पंधरा दिवसापासून पतीकडून छळ होत असल्याने कंटाळलेल्या पत्नीने एक विवाहित मुलगी, तिचा दीड वर्षाचा मुलगा, अविवाहित मुलगी व मुलगा यांच्यासह स्वत:ला घरात कोंडून घेत तब्बल ९ दिवस अन्नत्याग केला. या परिवाराचे बरेवाईट होण्याची शक्यता लक्षात घेता पतीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने कोंडलेल्या सर्वांची सुटका केल्याची घटना गुरुवारी दुपारी पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात घडली.

ठळक मुद्दे तब्बल ९ दिवस अन्नत्याग  न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी केली सुटका दीड वर्षाच्या बालकाचाही समावेश

जळगाव : गेल्या पंधरा दिवसापासून पतीकडून छळ होत असल्याने कंटाळलेल्या पत्नीने एक विवाहित मुलगी, तिचा दीड वर्षाचा मुलगा, अविवाहित मुलगी व मुलगा यांच्यासह स्वत:ला घरात कोंडून घेत तब्बल ९ दिवस अन्नत्याग केला. या परिवाराचे बरेवाईट होण्याची शक्यता लक्षात घेता पतीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने कोंडलेल्या सर्वांची सुटका केल्याची घटना गुरुवारी दुपारी पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात घडली.दिनकर रामदास पाटील (६२) असे उद्योजकाचे नाव असून पत्नी वैशाली, मुलगा उमाकांत, मुलगी राजश्री, रेणुका व राजश्रीचा मुलगा आर्या (दीड वर्ष) असे कोंडून घेण्या-या परिवाराचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी या सर्वांना बाहेर काढल्यानंतर आपण उपवास केला होता व स्वत:ला कोंडून घेतल्याचा इन्कार कुटुंबियांनी केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात दिनकर रामदास पाटील हे पत्नी वैशाली, मुलगा उमाकांत, मुलगी रेणुका तसेच विवाहित मुलगी राजश्री या कुटुंबासह वास्तव्यास आहे. दिनकर रामदास पाटील यांची एमआयडीसी परिसरात रेणुका इंजिनिअरींग नावाची कंपनी असून मुलगा उमाकांत इंजिनिअर असल्याने तोही कामात मदत करतो. मात्र, वडीलांकडून होणाºया त्रासामुळे गेल्या दोन महिन्यांपासून तो घरीच आहे.

काय आहे नेमका विषयदिनकर पाटील यांचा मुलगा उमाकांत पाटील व मुलगी रेणुका यांनी दिलेल्या माहितीनुसार,आई वैशाली यांना वडील दिनकर पाटील हे गेल्या पंधरा वर्षापासून कुठल्या ना कुठल्या कारणावरुन त्रास देतात, भांडण करतात, या भांडणातून त्यांनी अनेकदा आईला वडीलांनी मारहाणही केली, काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे भांडण झाले. अनेकदा त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करुनही त्रास कमी होईना.वडीलांकडून होणाºया छळाच्या आॅडीओ तसेच व्हिडीओ क्लीप्सही आमच्याकडे असल्याचे मुलांचे म्हणणे आहे. या त्रासामुळे आम्ही नऊ दिवसांपासून घरातून बाहेर पडलो नाही, मात्र थोडे थोडे रोज जेवण केले असेही ते सांगत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव