शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात भरदिवसा दोन ठिकाणी घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 20:12 IST

शहरात दररोज दिवसा किंवा रात्री चोरी व घरफोडीच्या घटना घडत आहेत. दोन महिन्यापासून तर एकही दिवस खंड पडलेला नाही. शुक्रवारी तर श्रध्दा कॉलनीतील नंदनवन कॉलनीत भरदिवसा सकाळी १० ते ११ या एक तासातच दोन ठिकाणी घरफोडी झाली. एक घरमालक पत्नीसह सत्संगाला तर दुसरा घरमालक औरंगाबादला असल्याने त्यांचा मुलगा तलाठी पदाची परीक्षा देण्यासाठी गेला होता. 

ठळक मुद्देनंदनवन कॉलनीतील घटनानंदनवन कॉलनीतील घटनापोलीस यंत्रणेला आव्हान

जळगाव : शहरात दररोज दिवसा किंवा रात्री चोरी व घरफोडीच्या घटना घडत आहेत. दोन महिन्यापासून तर एकही दिवस खंड पडलेला नाही. शुक्रवारी तर श्रध्दा कॉलनीतील नंदनवन कॉलनीत भरदिवसा सकाळी १० ते ११ या एक तासातच दोन ठिकाणी घरफोडी झाली. एक घरमालक पत्नीसह सत्संगाला तर दुसरा घरमालक औरंगाबादला असल्याने त्यांचा मुलगा तलाठी पदाची परीक्षा देण्यासाठी गेला होता. 

नंदनवन कॉलनीत शरद सुधाकर चव्हाण हे पत्नी प्रतिभा व मुलासह वास्तव्यास आहेत. ते इलेक्ट्रीकच्या दुकानावर कामाला आहे. मुलगा शाळेत गेला होता तर चव्हाण दाम्पत्य सकाळी ९ वाजता घराला कुलुप बंद करुन रिंगरोडवरील यशोदाय हॉल येथे सत्संगाच्या कार्यक्रमासाठी गेले होते.कार्यक्रम संपल्यानंतर ११.३० वाजता ते घरी आले असता घर उघडे तर घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. एका कपाटात ठेवलेले ११ हजार रुपये पत्नीचे काही दागिने चोरट्यांनी लांबविल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. सुदैवाने काही रक्कम व दागिने सोबतच असल्याने ते सुरक्षित राहिले. 

सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून लांबविले लाखांचे दागिनेचव्हाण यांच्या घरापासून काही ५० फुट अंतरावर असलेल्या सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथ श्रीधर चौधरी यांच्या मधूबन या बंद घरातून दोन तोळ्याचे मंगळसूत्र, प्रत्येकी ५ ग्रॅमचे कानातील तीन जोड, साडे सात ग्रॅमच्या साखळ्या, ५ ग्रॅमची अंगठी असा लाखो रुपयाची ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. बेडरुमधील साहित्याची नासधूस केली आहे. एका प्लास्टीकच्या डब्यात  ठेवलेले १ हजाराच्यावर काही रक्कम सुरक्षित होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव