जळगाव झाले जलगाव

By विलास.बारी | Published: August 20, 2017 05:35 PM2017-08-20T17:35:20+5:302017-08-20T20:04:16+5:30

८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ; वाघूर धरणात ९३ टक्के तर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ५९ टक्के उपयुक्त जलसाठा

Jalgaon becomes Jalgaon | जळगाव झाले जलगाव

जळगाव झाले जलगाव

Next
ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीजळगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया वाघूर धरणात ९३ टक्के जलसाठागिरणा धरणात ५२ तर हतनूर धरणात ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठाजिल्ह्यात पावसाच्या पुनरागमनाने पोळ्याचा आनंद झाला द्विगुणितरविवारी दुपारी तब्बल अर्धा तास पावसाने जळगावकर चिंब

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२० : जिल्हाभरात पावसाचे सुखद पुनरागमन झाले आहे. शनिवारी  दिवसभर झालेल्या पावसामुळे ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ५९ टक्के उपयुक्त साठा निर्माण झाला आहे. जळगाव शहरासाठी पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणात ९३ टक्के तर गिरणा धरणात ५२ टक्के उपयुक्त जलसाठा निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातून पाऊस गायब झाला होता. शुक्रवारपासून जळगाव जिल्ह्यातील विविध भागात पावसाचे शुभागमन झाले. शनिवारी झालेल्या भीज पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून बळीराजाला आनंद झाला आहे.
८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी
शनिवार १९ रोजी झालेल्या संततधार पावसामुळे ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात जळगाव तालुक्यात ८१ मिमी.,  एरंडोल १८१, धरणगाव १४९, मुक्ताईनगर ६७, बोदवड १६९, पाचोरा १९३, चाळीसगाव १३५, भडगाव ८९ मिमी पाऊस झाला.
वाघूर धरण ९३ टक्के भरले
जळगाव शहरासह भुसावळला पाणी पुरवठा करणारे वाघूर धरण दोन दिवस झालेल्या पावसामुळे ९३ टक्के भरले आहे. तर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा,जळगाव तालुका, धरणाव तालुक्यातील अनेक पाणी योजना अवलंबून असलेल्या गिरणा धरणात ५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे. हतनूर धरणात ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पात ५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे.
पोळ्याचा आनंद द्विगुणित
गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या पावसाचे पोळ्याच्या मुहूर्तावर आगमण झाल्याने बळीराजा आनंदी झाला आहे. वर्षभर शेतीत राबणाºया बैलाचा पोळ्याच्या निमित्ताने सन्मान आणि पावसाचे पुनरागमन यामुळे बळीराजाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
रविवारी जळगावकर चिंब
शनिवारच्या जोरदार पावसानंतर रविवारी सकाळपासून कमी अधिक प्रमाणात जळगावात पाऊस सुरु होता. दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास जळगाव शहरात तब्बल अर्धा तास पाऊस सुरु होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रविवारची सुटी जोरदार पाऊस यामुळे जळगावकरांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला.

शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्हाभरात कोठेही नुकसान झाल्याची माहिती नाही.
- नरविरसिंह रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव.

Web Title: Jalgaon becomes Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.