पाचोरा (जि. जळगाव) : पाचोरा येथील तालुकास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शेतकरी पिता- पुत्र बैलांसह सभास्थळी दाखल झाले आणि प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. मुख्यमंत्री शिंदेंकडे व्यथा मांडायची, असा आग्रह धरणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांना पोलिसांनी बैलांसह ताब्यात घेतले.मंगळवारी पाचोरा येथील एम.एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘ शासन आपल्या दारी ’ हा तालुकास्तरीय कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री येण्यापूर्वीच पिंपळगाव (ता. पाचोरा) येथील गणेश बडगुजर हे वडील आणि बैलजोडीसह सभास्थळी आले. काही वेळ गोंधळ उडाला. नंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. बडगुजर पिता-पुत्राने सांगितले की, बैलजोडी विकत घेऊन येताना जरंडी पोलिसांनी आपल्यावर गुन्हा नोंदवला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब यावी, म्हणून गळ्यात...साहेब मी शेतकरी बोलतोय, मला बोलायचे आहे, अशा आशयाचे बॅनर लावले. बैलांच्या पाठीवरही बॅनर होते.
Jalgaon: ‘शासन आपल्या दारी’साठी बैलासह बळीराजा हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 09:27 IST