शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे तरुणाला मारहाण करुन रोख रक्कम मोबाईल लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 13:27 IST

गुन्हा दाखल

ठळक मुद्देनवीन बी.जे.मार्केटमधील घटना९ हजार रुपये किमतीचा ऐवज

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २५ - कंपनीतून कामानिमित्त बी.जे.मार्केटमध्ये आलेल्या राहूल प्रकाश वाणी (वय ३०, रा.पिंप्राळा, जळगाव) या तरुणाला शाहरुख खान शाबीर खान (वय २६, रा.शिवाजी नगर, जळगाव) याने मारहाण करुन त्याच्याजवळील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल व चार हजार रुपये रोख असा ९ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घडली.दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे अल्ताफ पठाण व दिलीप पाटील यांनी वर्णनावरुनच शाहरुख याला अवघ्या चार तासात जेरबंद केले. त्याला शनिवारी तपासाधिकारी दिलीप पाटील यांनी न्या.डी.बी.साठे यांच्या न्यायालयात हजर केले असता २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राहूल हा एमआयडीसीत एका कंपनीत कामाला आहे. शुक्रवारी तो बी.जे.मार्केटमध्ये कामानिमित्त आला होता. काम आटोपल्यानंतर कंपनीत जाण्यासाठी निघाला असता मार्केटच्या पायऱ्यावरच एका तरुणाने त्याला अडवून मारहाण करायला सुरुवात केली. जबरदस्तीने हातातील पाच हजार रुपयाचा मोबाईल व मागच्या खिशात असलेले चार हजार रुपये काढून घेतले. या नंतर तो घटनास्थळावरुन पळून गेला. त्याचा पाठलाग केला, मात्र उपयोग झाला नाही. हा प्रकार समजल्यानंतर राहूल याचे नातेवाईक निलेश जगन्नाथ वाणी व सचिन प्रदीप भावसार यांनी बी.जे.मार्केट येथे धाव घेतली. तेथून सर्व जण जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आले. दिलीप पाटील व अल्ताफ पठाण यांनी शाहरुख याला ओळखले व चार तासातच त्याला पकडण्यात आले. त्याच्याविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा