शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव : शाळा सुरू होताच पालकांना आर्थिक भूर्दंड; पल्प महागला, वह्यांच्या किंमती वाढल्या!

By अमित महाबळ | Updated: April 3, 2023 16:48 IST

सीबीएसईचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे तर राज्य शिक्षण मंडळाचे दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत.

जळगाव : सीबीएसईचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे तर राज्य शिक्षण मंडळाचे दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे पालकांची शालेय साहित्याची खरेदी सुरू झाली आहे. पण यावर्षी त्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. वह्यांच्या किंमतीत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. कच्चा माल महाग झाल्यामुळे ही दरवाढ झाली आहे.

जळगावच्या मार्केटममध्ये नामांकित कंपन्यांच्या ब्रँडेड आणि स्थानिक पातळीवर उत्पादन असलेल्या वह्या, रजिस्टर विक्रीसाठी आहेत. वह्या बनविण्यासाठी आवश्यक असलेला कागद आणि तो बनविण्याचा लागणारा पल्प महाग झाल्यामुळे वह्यांच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी पालकांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड बसणार आहे. ही तर सुरुवात आहे. अद्याप पुस्तकांचे संपूर्ण संच बाजारात उपलब्ध झालेले नाहीत. पण त्यांच्याही किंमती वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

दोन देशातून पल्पची आयातव्यावसायिक सुबोध नेवे यांनी सांगितले, की वह्या बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल महागला आहे. कागद उत्पादनासाठी इंडोनेशिया व मलेशिया येथून पल्प आयात केला जायचा पण गेल्या काही दिवसांपासून इंडोनेशियाचा पल्प येत नाही. त्यामुळे मलेशियाच्या पल्पचे दर वाढले आहेत. देशातून ए-४ आकारातील कागद मोठ्या प्रमाणात निर्यात केला जात आहेत. त्याचाही परिणाम दरांवर झाला असून, २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वह्यांची दरवाढ झाली आहे. दर महिन्याला ही वाढ होतच आहे. एका वहीमागे ५ ते ७ रुपये तर रजिस्टरमागे ८ ते १० रुपये वाढले आहेत. ब्रँड व कागदाचा प्रकार यानुसार किंमती ठरतात.

यामुळेही किंमती वाढल्याजळगाव एमआयडीसीमध्ये वह्या व रजिस्टरचे उत्पादन केले जाते. त्यासाठी बल्लारशाह, आसाम व आंध प्रदेशातून कागद आणला जातो. पण कागदच महाग झाला आहे. इतर कच्चा माल, कामगारांची मजुरी, मशिनरी, वीज बिल या सगळ्यांचे खर्च वाढले आहेत. या सर्वांचा परिणाम वह्यांच्या किंमतीवर झाला आहे. पुठ्ठ्यांचे कव्हर जवळपास बंद झाले आहेत. त्याऐवजी सॉफ्ट बॉण्ड प्रकाराला ग्राहक पसंती देतात, अशी माहिती व्यावसायिकांनी दिली.

जळगावच्या मार्केटमधील दर स्थिती

प्रकार                     पूर्वी       आता२०० पानांची वही - २० ते ३० - ३० ते ४०१०० पानांची वही - १५ ते २० - २० ते २५२०० पानांची वही (१२ नग) - ३०० ते ३६० - ३०० ते ४५०१७६ पानांचे रजिस्टर (१२ नग) - ४८० ते ५४० - ६०० ते ७००२०० पानांचे रजिस्टर (१२ नग) - ०० - १०८०

टॅग्स :SchoolशाळाJalgaonजळगाव