शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या सैन्य भरतीने देशातील रेकॉर्ड मोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:32 IST

देशभरात वर्षभर कुठेना कुठे सैन्य भरती सुरुच असते. यामध्ये ८ ते १० जिल्हे मिळून होणाºया भरतीत जास्तीत जास्त ३५ ते ४० हजार युवक सहभागी होत असतात. मात्र, जळगावच्या भरतीने देशभरात झालेल्या सैन्य भरतीचा रेकार्ड मोडला आहे. माझ्या २८ वर्षांच्या सेवेत पहिल्यादांच सैन्यात भरती होण्यासाठी येथील तरुणांची जिद्द व उत्साह पाहून मी भारावलो असल्याचे मत कर्नल. एस. एस. कालिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

ठळक मुद्देकर्नल एस.एस.कालिया अभियांत्रिकी व विज्ञान शाखेचे तरुणही भरतीत सहभागी तरुणांची जिद्द कौतुकास्पद

सचिन देव । जळगाव : देशभरात वर्षभर कुठेना कुठे सैन्य भरती सुरुच असते. यामध्ये ८ ते १० जिल्हे मिळून होणाºया भरतीत जास्तीत जास्त ३५ ते ४० हजार युवक सहभागी होत असतात. मात्र, जळगावच्या भरतीने देशभरात झालेल्या सैन्य भरतीचा रेकार्ड मोडला आहे. माझ्या २८ वर्षांच्या सेवेत पहिल्यादांच सैन्यात भरती होण्यासाठी येथील तरुणांची जिद्द व उत्साह पाहून मी भारावलो असल्याचे मत कर्नल.  एस. एस. कालिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  विशेष म्हणजे बी.ई., बीएसस्सी सारख्या उच्चशिक्षित तरुणांनीदेखील या भरतीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून, अनेक तरुण अंतीम परीक्षेपर्यंत पोहचले असल्याचेही  कर्नल कालिया यांनी  सांगितले.या भरतीत जागेची मर्यादा नाही. जितक्या तरुणांनी भरतीसाठी नोंदणी केली आहे, तेवढ्या तरुणांना भरतीसाठी बोलावण्यात आले आहे. यामध्ये  शारिरीक चाचणीसह, अंतिम परीक्षा जास्तीत जास्त गुणांनी उत्तीर्ण होणाºया युवकांनी देशसेवेची संधी मिळणार आहे. जीडी, सोल्जर, टेक्नीकल व इतर पदासांठी घेण्यात आलेल्या या भरतीत, प्रत्येक पदासाठी परीक्षेचे स्वरुप वेगवेगळे राहणार आहे. जीडीसाठी दहावी तरविविध टेक्नीकल पदासाठी १२ उत्तीर्णची  अट असताना, त्या युवकांना त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार प्रश्न विचारला जाईल. भरतीसाठी तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने, दिवसा भरती घेणे अशक्य होते. सैन्य भरतीत अनेकवेळा एजंटपैसे घेऊन युवकांना सैन्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवित असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे कोणी, पैसे देऊन नोकरीचे आमिष दाखवित असेल तर त्याने लगेच आमच्याशी संपर्क साधवा, त्याच्यावर तत्काळ कारवाई करणार असल्याचेही कर्नल.  कालीया यांनी सांगितले. धुळ्याची भरती झाली जळगावलाया भरतीत सर्वाधिक १५ हजार मुले जळगाव जिल्ह्यातील असल्याने, सैन्यात जाण्यासाठी येथील तरुणांमध्ये उत्साह आणि जिद्द दिसून आली. याचा खूप आनंद वाटला. भरतीसाठी आलेल्या ६० हजार युवकांपैकी निम्याहून अधिक युवक जळगाव, धुळे, नंदुरबारचेच दिसून आले. ही खरोखर अभिनानाची गोष्ट आहे. ही भरती धुळचेला घेण्याचे ठरवले होते. मात्र, तेथील जिल्हा प्रशासनातर्फे सहकार्य करण्यास असमर्थता दर्शविल्याने, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकरांशी आम्ही संपर्क साधला. त्यांनी मात्र लगेच सहकार्य केल्याने जळगावात सैन्य भरती घेण्यात आली.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी