शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव व धरणगाव तालुक्यात २४ पैकी १६ ग्रा.पं. वर शिवसेनेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 19:21 IST

जळगाव ग्रामीण मतदार संघातील २४ ग्रा पं च्या मतमोजणीत शिवसेनेने तबल १६ ठिकाणी विजय मिळवला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

ठळक मुद्देजळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात १६ ग्रा.पं.वर शिवसेनेचे वर्चस्वजळगाव व धरणगाव तालुक्यात प्रत्येकी ८ जागी शिवसेनानवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा केला सहकार राज्यमंत्र्यांनी सत्कार

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२७ : जळगाव ग्रामीण मतदार संघातील २४ ग्रा पं च्या मतमोजणीत शिवसेनेने तबल १६ ठिकाणी विजय मिळवला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. शिवसेनाच आपल्या पाठीशी राहू शकते हा मतदारांनी शिवसेनेवर जो विश्वास टाकला त्याचा हा विजय असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जळगाव तालुक्यात ११ पैकी ८ ठिकाणी भगवा !जळगाव तालुक्यातील ११ ग्राम पंचायतीची निवडणुक जाहीर झाली होती पैकी ग्रामपंचायत पळसोद बिनविरोध झाली होती. बुधवारी जाहीर झालेल्या निकालात ११ पैकी ८ ग्रा.पं. वर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. निमगाव-बेडी, खेडी,पाथरी, डोमगाव, विटनेर, धामणगाव, सुभाषवाडी व पळसोद या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे. तर २ ठिकाणी भाजपा व १ ग्रा.पं. राष्ट्रवादी च्या ताब्यात आली आहे. तालुक्यात एकूण ९१ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ६८ ग्रा.पं.सदस्य शिवसेनेचे विजयी झाल्याचा दावा केला आहे.धरणगाव तालुक्यात १३ पैकी ८ ग्रा.पं.शिवसेनेकडेतालुक्यातील १३ ग्रामपंचायती पैकी २ ग्रा.पं. बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १३ पैकी भोद, फुलंपाट, निमखेडा, झुरखेडा, बाभूळगाव, तरडे, खामखेडा व टहाकळी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेने विजय प्राप्त केला आहे. उर्वरित ५ ग्रा.पं. पैकी तीन ठिकाणी राष्ट्रवादी तर २ ठिकाणी भाजपा चा विजय झाला आहे. तालुक्यात एकूण ९७ ग्रामपंचायत सदस्या पैकी ५७ सदस्य शिवसेनेचे असल्याचा दावा करण्यात आला आहे.नवनिर्वाचित सरपंच व ग्रा.पं.सदस्यांचा सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजीव पाटील, जळगाव तालुका प्रमुख नाना सोनवणे, धरणगाव तालुका प्रमुख गजानन पाटील, उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, सलीम पटेल, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पप्पू सोनवणे यांनी सत्कार करीत अभिनंदन केले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावDharangaonधरणगाव