शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

कंत्राटी कर्मचा-यांना शासकीय सेवेत कायम करण्यासाठी जळगावात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:35 IST

कंत्राटी कर्मचारी कृती समितीतर्फे मूकमोर्चा काढत जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

ठळक मुद्देकंत्राटी कर्मचारी कृती समितीतर्फे मूकमोर्चाजिल्हाधिकाºयांना दिले विविध मागण्यांचे निवेदनआंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.३- कंत्राटी कर्मचाºयांना शासकीय सेवेत कायम करावे या मुख्य मागणीसाठी जिल्हा कंत्राटी कर्मचारी कृती समितीर्फे शनिवार, ३ रोजी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चाची सुरुवात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून झाली. सुरुवातीस हा मोर्चा जिल्हा परिषदेवर आला. या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांना निवेदन देण्यात आला. येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी प्रांताधिकारी अभिजित भांडे यांंना निवेदन देण्यात आले.कृती समितीचे अध्यक्ष विजय रामदास शिंदे, उपाध्यक्ष शांताराम वामन अहिरे, सचिव दत्तू हरसिंग पाटील, समन्वयक भिमराव सूरदास व निलेश रायपूरकर आदींच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेल्या पदावरील नेमणुकीच्या अटी- शर्र्तींबाबत तसेच या पदावर नियुक्त कर्मचाºयांच्या सेवा नियमीत न करण्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने ९ फेब्रुवारी रोजी काढले आहे. हे परिपत्रक संपूर्ण राज्यात शासकीय विभागांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांवर अन्याय करणारे असून यामुळे कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अनेक कर्मचाºयांंना १५ ते २० वर्षे या सेवेत झाली आहेत. अनेक कर्मचाºयांचे शासकीय नोकरीची वयोमर्यादाही संपली असून आताचा हा निर्णय अन्यायकारक आहे. यामुळे अनेक कर्मचाºयांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहणार आहे. ही बाब लक्षात घेता हा सेवेत कायम न करण्याचा जीआर मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या संघटनांनी पाठिंबा दिला तसेच सहभागी झाल्या. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी/ कर्मचारी महासंघ, सर्व शिक्षा अभियान करार कर्मचारी कृति समिती, एड्स नियंत्रण कर्मचारी संघटना, स्वच्छ भारत मिशन संघटना, मनरेगा संघटना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, एकात्मिक पाणलोट, व्यवस्थापन संघटना, संग्राम संघटना, ग्रामीण भूजल सर्वेक्षण संघटना, सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम संघटना.

टॅग्स :Jalgaonजळगाव