शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव : सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन तरुणाची आत्महत्या, कुटुंबीयांचा घातपाताचा आरोप

By सुनील पाटील | Updated: September 4, 2022 20:07 IST

राजमालती नगरातील घटना.

जळगाव : दूध फेडरेशन परिसरातील राजमालती नगरात समृध्दी अपार्टमेंट या सात मजली इमारतीवरुन उडी घेऊन कृष्णा सुधीर अहिरे (वय १८,रा.हरिविठ्ठल नगर) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजता घडली. सकाळी घरी येऊन कृष्णा याला चार जणांनी धमकी दिली होती, त्यांनीच त्याला मारल्याचा आरोप कृष्णाच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, आरोपासह सर्व संशय, शक्यतांची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा याला स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसापूर्वी दुचाकी चोरीच्या प्रकरणात ताब्यात घेतले होते. दुसऱ्याने चोरलेल्या दुचाकी कृष्णाने विक्री केल्या होत्या. या चारही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्यामुळे ज्यांनी या दुचाकी घेतल्या होत्या त्यांनी कृष्णाकडे पैशाचा तगादा लावला होता. याच प्रकरणातून रविवारी चार जण घरी आले होते. आमचे पैसे परत कर असे सांगून धमकावत होते. पैसे कसे काढायचे हे आम्हाला चांगले माहिती आहे असे हे चारही जण सांगत होते, अशी माहिती कृष्णाचे वडील व भावाने दिली. हे चार जण गेल्यानंतर तासाभराने कृष्णा घरातून गेला होता. दरम्यान, दुचाकी प्रकरणात काही पोलिसांनी मुलाचा खूप छळ केला असाही आरोप सुधीर अहिरे यांनी केला. दुचाकी चोरीचा जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

या इमारतीत आलाच कसा?राजमालती नगरातएकही मित्र किंवा नातेवाईक नाहीत, त्यामुळे तो या भागात आलाच कसा? असा प्रश्न त्याच्या वडिलांनी उपस्थित करुन त्याला तेथे नेण्यात आले व इमारतीवरुन ढकलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मुलाचा मृतदेह पाहून आईची शुद्धच हरपली होती. कृष्णाचे वडिल, भाऊ व आई तिघांचा प्रचंड आक्रोश सुरु होता. मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांना अटक केल्याशिवाय पोलिसांना जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत कुटूंब पोलीस वाहनाच्या समोर आडवे झाले होते. जळगाव शहर व जिल्हा पेठ पोलिसांनी कुटुंबीयांची समजूत घातली.

तरुणीशी प्रेमसंबंधकृष्णा याचे वाघ नगर परिसरातील एका तरुणीशी प्रेमप्रकरण सुरु होते, मात्र दोघांमध्ये काही तरी बिनसले होते. त्यामुळे कृष्णा तणावात होता. तरुणीच्या मामाने देखील फोन करुन कृष्णाला धमकावले होते, असा आरोप त्याच्या वडिलांनी केला. दरम्यान, प्रेमप्रकरण, दुचाकी चोरी व विक्रीचे प्रकरण, वडिलांनी केलेले आरोप या सर्व मुद्यांवर तपास केला जात असून मोबाईल लॉक असल्याने काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यातून बरेच काही समोर येईल, मात्र सर्व शक्यतांवर तपास केला जात असल्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी ‘लोकमत’ सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव