शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

डुडल आर्ट फेस्ट स्पर्धेत जैन इरिगेशनचे आर्स्टिस्ट विजय जैन व मिलींद पाटील यांना पुरस्कार

By admin | Updated: May 2, 2017 15:14 IST

डुडल आर्ट फेस्ट-२०१७ या स्पर्धेत जैन इरिगेशनचे आर्टिस्ट विजय जैन व मिलींद पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 जळगाव, दि.२- मुंबई येथील ‘मंथन स्कूल’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या डुडल आर्ट फेस्ट-२०१७ या स्पर्धेत जैन इरिगेशनचे आर्टिस्ट विजय जैन व मिलींद पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मुंबई येथील मंथन स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘डुडल फेस्ट’ या स्पर्धेत संपूर्ण भारतातून विविधस्तरातील कलाकार भाग घेतात. समाज प्रबोधनपर माहितीकरीता फोटोग्राफीक, टायपोग्राफीक, इलेस्ट्रेटीव्ह जाहिरातींची मांडणी करून स्पर्धेत प्रवेशिका पाठवित असतात. यावर्षी देशभरातील विविध कलाकारांनी प्रवेशिका पाठविल्या होत्या. त्यापैकी ५० कलाकृती प्रदर्शनासाठी निवडण्यात आल्या होत्या. त्यात जळगाव जैन इरिगेशनचे सहकारी विजय जैन व मिलींद पाटील यांच्या कलाकृतींना नामांकन  मिळाले होते.
विजय जैन यांनी ‘सार्वजनिक स्वच्छतेचा भाग’ या विषयावर अतिशय मार्मिक स्लोगन तयार केले होते. यात  प्रार्थनेच्या वेळी एका विद्यार्थ्याने केळीचे साल अन्य ठिकाणी न फेकता आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवून स्वच्छतेचे भान ठेवले असा विषय मांडला होता. तर मिलींद पाटील यांनी अजाणत्या वयात केल्या जाणाºया विवाहाचे दुष्परिणाम दर्शविण्यासाठी समर्पक असे अपूर्ण वाढीचे शहाळे हे फोटोग्राफीक पद्धतीने मांडले होते. त्यात विजय जैन यांना प्रथम पुरस्कार म्हणून २५ हजार रुपये रोख व मानचिन्ह तसेच मिलींद पाटील यांना   ‘ पब्लिक मोस्ट अ‍ॅप्रिशीएशन अ‍ॅवार्ड’ म्हणून प्रमाणपत्र व मानचिन्ह मुंबई येथील प्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओलवे यांच्या हस्ते एका सोहळ्यात प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दोघा कलाकारांचे अभिनंदन केले आहे.