गुळ प्रकल्प भरला ७७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 05:53 PM2020-08-28T17:53:25+5:302020-08-28T17:53:34+5:30

चोपडा तालुका : पावसाने सलग दुसऱ्या वर्षी गाठली सरासरी

The jaggery project is 77 percent complete | गुळ प्रकल्प भरला ७७ टक्के

गुळ प्रकल्प भरला ७७ टक्के

Next

चोपडा : तालुक्यात सरासरी ७१९ मिलिमीटर एवढ्या म्हणजे १०० टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरी आहे. त्या तुलनेत दिनांक २७ आॅगस्ट पर्यंत ७१९.५ मिमी एवढा पाऊस पडला आहे.त्यात मालापुर येथील गुळ प्रकल्प एकूण जिवंत जलसाठयाच्या ७७ टक्के भरला आहे.
दमदार पाऊस तालुक्यात पडल्याने या वर्षी या प्रकल्पात पाणी भरपूर जमा झाले आहे. एवढेच नाही तर दररोज या मध्यम प्रकल्पातून ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तालुक्यात सध्या पर्यंत १००.०६ टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली आहे. तसेच या गुळ प्रकल्प परिसरात ९७० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे, अशी माहिती शाखा अभियंता प्रीती पोटदुखे यांनी दिली. गूळ प्रकल्पात सध्याच्या पाणीसाठ्याची लेव्हल २६६.६९० मीटर एवढी आहे.या धरणात एकूण २३.२५ दलघमी एवढा एकूण साठा क्षमता आहे. त्यापैकी ०.४९ दलघमी एवढा मृत साठा आहे. आणि जिवंत पाणी साठा २२.७६ दलघमी एवढा आहे. जीवंत पाणी साठ्याच्या तुलनेत सध्याचा पाणी साठा १७.२९ दलघमी एवढा झालेला आहे. तर एकूण पाणी साठा १७.७८ दलघमी आहे. अजून काही दिवसात जोरदार पाऊस होऊ शकतो त्यामुळे हा प्रकल्प या वर्षी पूर्ण पाणी भरण्याची आशा आहे. आॅगस्ट अखेर पाण्याचा विसर्ग थांबविण्यात येतो व त्यानंतर पाऊस पडला तर धरणाची पाणी पातळी शंभरी कडे जाईल.

Web Title: The jaggery project is 77 percent complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.