शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

पाकव्याप्त काश्मीरचा भारताच्या नकाशातील जम्मू व लडाख या प्रांतात केलेला समावेश ही अभिमानाची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:19 IST

सरकारने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक व बारामुल्ला हवाई हल्ले करून वापरलेल्या सामरिक युध्दनीतीमुळे पाकिस्तान नरमला आहे

ठळक मुद्देरावेर : रंगपंचमी व्याख्यानमालेत सेवानिवृत्त मेजर जनरल शिशिर महाजनजम्मू आणि काश्मीर भारताचे अभिन्न अंगसरकारचे बदलते धोरण सैन्यदलासाठी डोकेदुखीपाकिस्तानची दहशतवादी संघटनांवर कॉस्मेटिक कारवाई

रावेर, जि.जळगाव : पाकिस्तानी घुसखोर दहशतवाद्यांवर पूर्वी नियंत्रण रेषेलगत गस्त घालून वा दबा धरून हल्ला करण्याच्या धोरणात मोठा बदल केला आहे. सरकारने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक व बारामुल्ला हवाई हल्ले करून वापरलेल्या सामरिक युध्दनीतीमुळे पाकिस्तान नरमला आहे किंबहुना कलम ३७० रद्दबातल केल्यानंतर पाकव्याप्त काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग असल्याचे दर्शवतांना भारताच्या नकाशावर जम्मू व लडाख या दोन्ही प्रांतात समाविष्ट केल्याची बाब देशासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन यांनी येथे केले.सरदार जी.जी. हायस्कूलच्या गोपालदास अग्रवाल रंगमंचावर रंगपंचमी व्याख्यानमालेचे ‘जम्मू आणि काश्मीर : काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यानाचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. भवरलाल जैन व कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशनतर्फे हे व्याख्यान प्रायोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी होते.प्रारंभी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन आमदार शिरीष चौधरी, निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन, विश्वस्त दिलीप वैद्य, राजेंद्र कोल्हे, सचिन जाधव, नीलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.विश्वस्त दिलीप वैद्य यांनी प्रास्ताविक केले. आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर शहराची संस्कृती जीवन व ज्ञान उन्नत करण्याची सुरू असलेली रंगपंचमी व्याख्यानमालेची ही धडपड अभिमानास्पद असल्याचे स्पष्ट केले.सेवानिवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन म्हणाले, देशवासीयांना जम्मू आणि काश्मीरसंबंधी खूपच ज्ञान कमी असल्याचे शल्य वाटते. सन १९८० मध्ये ९०० सैन्यदलातील अधिकारी, सहायक अधिकारी व सैनिक अशी मराठा रेजिमेंट घेऊन पिथोरागडहून जम्मू मार्गे जवाहर टनल पार करून काश्मीरमध्ये श्रीनगरला गेलो. तिथले लोक म्हणाले ‘आप हिंदूस्थान से आये है क्या?’ ही भेदभावाची त्यांची राष्ट्रनिष्ठा सन २०११ मध्येही काश्मीरवासीयांच्या मनातील भावना कायम असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.प्राचीन काळी कश्यप ऋषींनी हिमालयाच्या डोंगराची रांग कापल्यानंतर जे खोरे तयार झाले तेच काश्मीर खोरे म्हणून ओळखले जाते. या काश्मीर खोऱ्या सभोवती पिरपंजाल, ग्रेट हिमालय रेंज आहे. जम्मू आणि काश्मीरचा इतिहास पाहता सन १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर ५६५ राजांची संस्थाने होती. महाराजा हरिसिंग यांनी करार करून जम्मू आणि काश्मीर भारतात विलीन केले. त्या करारावर स्वत:च्या मर्जीने स्वाक्षरी केली होती. तेव्हापासून जम्मू आणि काश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे. मात्र पाकिस्तानला हे मुस्लीम बहुूल राज्य असल्याने ते भारताचे कसे असू शकते? म्हणून पाकिस्तानच्या कुरापती सुरू राहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भारत-पाकिस्तानमध्ये सन आॅक्टोबर १९४७ ते जानेवारी १९४९ पर्यंत युद्ध झाले. त्यात भारत जिंकले. पण पाकिस्तानने युनोत प्रकरण नेले होते. १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान युध्दातील सैन्य ज्या ठिकाणी थबकले तिच ही नियंत्रण रेषा असून सियाचीन ग्लेशरची आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे. पाकिस्तानने १९६५ मध्ये युद्ध केले. ते आपण जिंकले. १९६६ मध्ये अमानुल्लाखान आणि मकबूल भट यांनी करार केला होता. त्यावेळी हाजीपीर खिंड आपण जिंकूनही पाकिस्तानला परत करून मोठी चूक केल्याने उरी आणि पुँछमध्ये ती आता मोठी अडसर ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सन १९७१ मध्ये पाकिस्तान बरोबरच्या युध्दात भारत विजयी झाला. पाकिस्तान सैन्याचे जनरल नियाझी जे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे वडील होते. त्यांनी आपले जनरल अरोरा यांच्याकडे आत्मसमर्पण करून बांगलादेशाची निर्मिती केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पाकिस्तानचे बंदी असलेले ९३ हजार कैदी सीमला कराराच्या वेळी परत केले. मात्र आपण आपले कैदी परत घेतले नाही ही मोठी घोडचूक भारताने केली. सन १९८९ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री सईद यांची कन्या रूहीया सईदच्या अपहरणात लिबरल फ्रंटचे दहशतवादी परत केल्याची घोडचूक भारत सरकारने केली.सन १९८७ मध्ये जनरल झिया उल हक यांनी पारंपरिक पद्धतीने युध्दात भारतावर विजय प्राप्त करता येत नाही हे ओळखून बदला घेण्यासाठी पाकिस्तानी सैन्य व आयएसआय यांच्या माध्यमातून छुपे युध्द सुरू केले. कमी किमतीत छोटे छोटे घाव करून भारतााला रक्तबंबाळ करण्याचा त्यांनी घाट घातला. जम्मू आणि काश्मीरमध्ये विद्रोह करून नियंत्रण रेषेवर ताबा मिळवून अतिरेकी कारवाया करत जम्मू आणि काश्मीरवर कब्जा करण्याची त्यांची रणनीती होती व आजही आहे.पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी प्रशिक्षण केंद्र उभारून तरूणांना २१ दिवस हत्यारे, ग्रेनेड चालवण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यातील आणखी निवडक कुशल युवकांना आणखी पुढील प्रशिक्षण देवून अतिरेकी कारवायांसाठी भारतात घुसखोरी केली जाते. पाकिस्तान सैन्याच्याच लाँचपॅडवरून त्यांना पाठवले जात असल्याचे स्पष्ट केले. लष्कर ए तोयबा, आयएसआय व पाकिस्तान सैन्याचेच हे अतिरेकी बाहूले ठरले आहेत.सन २००९ मध्ये संसद भवनावर झालेला हल्ला जवळून पाहिला. दिल्ली व मुंबई बॉम्बस्फोट केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक करण्याची कुटनीती अवलंबून गोळीबार केला तर मानवी हक्क कायद्याची ते ढाल वापरत असत. आंबुश, गस्त, घेराबंदी, रोड ओपनिंग, मोबाईल चेकपोस्ट अशा प्रकारच्या कारवाया करताना दहशतवादी नेहमी लहान मुले व स्त्रियांची ते ढाल वापरून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले.कलम ३७० काढल्यानंतर जम्मू आणि काश्मीर राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. राजकीय काश्मिरी नेते नजरकैदेत आहे. व्हॉटसअ‍ॅप दहशतवादींचे एक मोठे हत्यार असल्याने इंटरनेट सेवा बंद केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचलन विठोबा पाटील यांनी केले तर आभार नीलेश पाटील यांनी मानले.सरकारचे बदलते धोरण सैन्यदलासाठी डोकेदुखीभारतीय सैन्य दलातील जवानांना सरकारचे कधी लवचिक तर कधी उग्र असलेले बदलते धोरण डोकेदुखी ठरते. सैन्यदलासाठी स्थिर धोरण असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सैनिक जवानांसमोर सतत २४ तास सतर्क राहणे, गुप्तहेर व सुरक्षा संस्थामध्ये असलेल्या चढाओढीचे मोठे आव्हान उभे ठाकलेले असते.पाकिस्तानची दहशतवादी संघटनांवर कॉस्मेटिक कारवाईपारंपरिक युध्दात १३ हजार १४० जवान शहीद झाले. हजारो सर्वसामान्य माणसांची जीवित हानी विविध दहशतवादी हल्ल्यात झाली. म्हणून अतिरेकी संघटनांवर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र पाकिस्तान या अतिरेकी संघटनांवर कॉस्मेटिक कारवाई करीत असल्याची खंत व्यक्त करून चीनची नेहमीच तिबेटवर डोळा ठेवून पाकिस्तानला मदत राहत असल्याचे निक्षून सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर