शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी मुद्रांक मिळणे कठीण कारण, विक्रेते करणार धरणे आंदोलन!

By अमित महाबळ | Updated: October 29, 2023 18:12 IST

राज्य शासन १०० आणि ५०० रुपयांचे मुद्रांक बंद करणार असल्याच्या चर्चेने मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांमध्ये निषेधाचे वादळ उठले

जळगाव : राज्य शासन १०० आणि ५०० रुपयांचे मुद्रांक बंद करणार असल्याच्या चर्चेने मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांमध्ये निषेधाचे वादळ उठले असून, सरकारच्या संभाव्य निर्णयाविरोधात विक्रेत्यांकडून सोमवारी (दि. ३०) तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले जाणार आहे. यामुळे आज मुद्रांक विक्रेत्यांचे कामकाज बंद राहणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार १०० आणि ५०० रुपयांचे दोन्ही मुद्रांक बंद करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्या व्यवसायावर गंडांतर येऊ घातले आहे. या विरोधात आता निषेधाचा सूर उमटायला लागला आहे. हा प्रश्न जनतेसमोर व शासनासमोर मांडण्यासाठी शासनमान्य मुद्रांक विक्रेते अर्ज व दस्तलेखक महासंघ यांच्या नेतृत्वात सोमवारी (दि. ३०) एकदिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. ... तर फ्रँकिंगसाठी मशिनरी द्या

भविष्यात मुद्रांक विक्री धोरणात बदल होऊन फ्रँकिंग मशीन वापरले जाणार असल्यास हे काम स्टॅम्प वेंडरमार्फत केले जावे, सर्व परवानाधारकांना फ्रँकिंगसाठी आवश्यक असणारी मशिनरी विनामूल्य व विनाअट द्यावी, नवीन प्रशासकीय इमारतीत मुद्रांक विक्रेते यांना कायमस्वरूपी बसण्याची जागा द्यावी, मुद्रांक विक्रेते अर्ज व दस्तलेखक बांधव यांचे पुनर्वसनासाठी महामंडळाची स्थापना करावी, आदी मागण्या विक्रेत्यांच्या संघटनेमार्फत करण्यात आल्या आहेत. सरकारकडे मागण्या

१०० आणि ५०० रुपयांचे मुद्रांक बंद करू नये, मुद्रांक विक्रेते यांच्या वारसांना परवाने हस्तांतरित करून मिळावे, मुद्रांक विक्रीचे कमिशन तीन टक्क्यांऐवजी ५ टक्के किंवा १० टक्के करावे किंवा सेवाशुल्क आकारण्यास परवानगी मिळावी, मुद्रांक विक्रीची मर्यादा १० हजार रुपये वरून एक लाख रुपयांपर्यंत मिळावी, अशी मागणी मुद्रांक विक्रेत्यांची असल्याचे शासमान्य मुद्रांक विक्रेते अर्ज व दस्तलेखक महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र मुद्रांक समितीचे राज्य सदस्य वासुदेव चव्हाण यांनी म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यात ८०० वर मुद्रांक विक्रेते

जळगाव जिल्ह्यात ८००, तर जळगाव शहरात १०० पेक्षा अधिक मुद्रांक विक्रेते आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आंदोलन केले जाणार आहे. मुद्रांक बंद करण्याबाबत मंत्री, अधिकारी यांच्याकडून विसंगत माहिती समोर येत असल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे, असे वासुदेव चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव