शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
8
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
9
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
10
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
11
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
12
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
13
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
14
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
15
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
16
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
17
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
18
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
19
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
20
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 

महिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 03:00 IST

जळगाव महिला मृत्युप्रकरण : उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

मुंबई : जूनमध्ये जळगावच्या सिव्हिल रुग्णालयातून ८२ वर्षांची कोरोनाग्रस्त महिला गायब झाली आणि आठव्या दिवशी रुग्णालयाच्या शौचालयातच तिचा मृतदेह आढळला. सरकारने कदाचित कारणे-दाखवा नोटीस बजावली असेल, पण याने कुटुंबीयांचे सांत्वन होईल का? कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची राज्य सरकारची जबाबदारी नाही का? असा सवाल करत उच्च न्यायालयाने सरकारला या घटनेसंदर्भात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. 

महिलेचा शवविच्छेदन अहवाल सादर करण्याचे निर्देशही मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने दिले.कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट राज्य व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. याआधीच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने शेलार यांना त्यांनी सरकारवर केलेल्या निष्काळजीच्या आरोपाचे समर्थन करणाऱ्या राज्यव्यापी घटनांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, शेलार यांनी उच्च न्यायालयात यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले.या प्रतिज्ञापत्रात शेलार यांनी जळगावच्या घटनेचा उल्लेख केला. ही घटना धक्कादायक आहे. महिलेचा मृतदेह सापडण्यापूर्वी ती रुग्णालयातून आठ दिवस गायब होती. आठव्या दिवशी तिचा मृतदेह  रुग्णालयाच्या शौचालयात आढळतो. हे चिंताजनक नाही का? असा सवाल न्यायालयाने केला. महिलेचे शवविच्छेदन केले का? तिचा मृत्यू २ जूनला झाला नाही, पण मृतदेह सापडला त्या दिवशी म्हणजे १० जूनला झाला तर ती आठ दिवस अन्नाशिवाय जगली. हे अमानवी आहे, महिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का? असा सवाल न्यायालयाने केला. यावर राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत ५ आॅक्टोबर रोजी सुनावणी ठेवली.

टॅग्स :Jalgaonजळगावhospitalहॉस्पिटलHigh Courtउच्च न्यायालय