शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनच्या १२ कोटींच्या कामांना स्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 11:32 IST

जि.प.स्थायी समिती सभेत ठराव : हायमास्टच्या कामांनाही थांबा

जळगाव : लघुसिंचन विभागाने या वर्षी दिलेल्या १२ कोटी रूपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश थांबवावेत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला़ कार्यकारी अभियंता नाईक यांनी कोणालाही विश्वासात न घेता वैयक्तिक नियोजन केल्याचा ठपका या सभेत ठेवण्यात आला़ या मुद्यावरून नाईक यांना कार्यमुक्त करण्याच्या ठरावावर पुन्हा एकदा वादळी चर्चा झाली़ याकामांसाठी स्वतंत्र निधी आणून १८ कोटींच्या कामांचे स्वतंत्र नियोजन करावे, असे ठरविण्यात आले.लघुसिंचन विभागाला जिल्हा नियोजन समितीकडून १८ कोटी रूपयांचे नियत्वे प्राप्त झाले होते़ यापैकी १२ कोटी रूपयांचे नियोजन कार्यकारी अभियंता आऱ के़ नाईक यांनी आधिच करून घेतले होते़ याबाबत अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जलव्यवस्थापन समिती, कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती, शिवाय दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य आवश्यक असताना नवीन कामे यात घेण्यात आल्याचा मुद्दा शिवसेना सदस्य नानाभाऊ महाजन उपस्थित केला़ज्या कामांच्या आॅर्डर देण्यात आल्या आहेत, त्या कामांसाठी विशेष निधीची तरतूद करून १८ कोटी रूपयांचे स्वतंत्र नियोजन करावे, असे सभेत ठरविण्यात आले़त्यानुसार १२ कोटींच्या कामांची चौकशी होऊन पुढील नियोजन ठरणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली़दरम्यान, समाज कल्याण विभागाचा अडीच कोटी निधी खर्च होत नसल्याचा तसेच अपंगाच्या योजना व्यवस्थित असाव्यात, शिक्षक पदोन्नत्या आदी विषय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आले़मंजुरी आधीच वर्कआॅर्डरलघुसिंचन विभागाला प्राप्त नियतव्यय सर्वसाधारण सभेत १७ जून रोजी मंजुरी करण्यात आले होते़ मात्र, त्या आधीच ६ जून रोजी १२ कोटींच्या कामांचे कार्यारंभ आदेश कसे देण्यात आले, हा प्रश्न उपस्थित केला़ यात ७५ कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी ४८ कामांना वर्कआॅर्डर दिल्याचे आऱ के़ नाईक यांनी सांगितले़ मात्र, क्लर्क भोई यांना बोलावून सदस्यांनी रजिस्टरची तपासणी केली असता एकाही कामाला वर्कआॅर्डर दिली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे सांगण्यात आले़ नाईक हे भर सभागृहात खोटे बोलत असून आधीच त्यांच्या कार्यमुक्तीच्या ठरावाची अंमलबजावणी झाली असती तर ही वेळ आली नसती, अशा संतप्त प्रतिक्रिया सदस्यांनी व्यक्त केल्या़विखरणचा तलाव २५ वर्षांपासून रखडलाजलयुक्तची कामे होऊनही विखरण चोरटकी या एकमेव गावाला एरंडोल तालुक्यात टँकर सुरू आहे़ येथील पाझर तलाव २५ वर्षांपासून दुरूस्तीसाठी केवळ दहा ते पंधरा लाखांसाठी अडकून पडला आहे, त्याच्याकडे लक्ष दिल्यास दहा गावांचा पाणीप्रश्न सुटेल. मात्र, याकडे लक्ष न देता नवीन कामांना मंजूरी देण्यात आल्याचे नानाभाऊ महाजन यांनी म्हटले आहे़हायमास्टची कामे कशी?जनसुविधा, नागरीसुविधा व तीर्थक्षेत्र विकास यात हायमास्टची कामे घेऊ नये, असे प्रशासनाचे पत्र असल्याने अन्य सदस्यांची कामे घेतली नाही, त्यामुळे रावेर, यावल, मुक्ताईनगर आदी ठिकाणची हायमास्टची कामे कशी, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या ठिकाणची सुमारे एका कोटी वीस लाख रूपयांची कामे थांबविण्याचे आदेश उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी सभेत दिले़

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव