शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बाजार समित्यांची तपासणी पूर्ण, अहवालात दडलयं काय? सोमवारी अहवाल सादर

By सुनील पाटील | Updated: April 15, 2023 15:08 IST

‘सहकार’कडून झाली चौकशी

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या खासगी बाजार समितीची सहकार विभागाने दोन दिवसापूर्वी तपासणी केली असून चौकशी पूर्ण झालेली आहे. त्यात नेमका काय दोष आढळला किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. सोमवारी आपल्याकडे अहवाल येईल, तेव्हा पडताळणी करुन हा अहवाल पणन संचालक (पुणे) यांच्याकडे पाठविला जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी ‘लोकमत’ ला दिली.

जळगाव तालुक्यातील आव्हाणे  व धरणगाव येथील भोद खुर्द शिवारातील खासगी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्या मालकीची आव्हाणे शिवारातील लक्ष्मी कृषी उत्पन्न बाजार समिती  व धरणगाव येथील नीलेश चौधरी यांच्या मालकीच्या बाजार समितीच्या जागांची पणन संचालकांच्या आदेशाने सहकार विभागाच्या दोन पथकांनी गुरुवारी तपासणी केली होती. या दोन्ही बाजार समित्या खासगी मालकीच्या आहेत. पाळधी, ता.धरणगाव येथील प्रशांत नारायण झंवर यांनी १० एप्रिल रोजी पणन संचालक (पुणे) यांच्याकडे दोन स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या.त्याची दखल घेऊन अचानकपणे या दोन्ही बाजार समितींची तपासणी करण्यात आली. दोन्ही ठिकाणाहून पथकाने कागदपत्रे ताब्यात घेतली असून अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सोमवारी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्याकडे सादर होईल. त्यानंतर बिडवई आपल्या शिफारशीने तो पुणे पणन संचालकांकडे सादर करतील. या अहवालात नेमकं काय दडलयं हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही. आव्हाणे येथील जागेची विशाल ठाकूर तर भोद येथील जागेची महेंद्र गाडे यांच्या नेतृत्वात तपासणी करण्यात आली होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jalgaonजळगाव