ग.स.तील अनागोंदी कारभाराची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:50 AM2021-02-05T05:50:25+5:302021-02-05T05:50:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.) मध्ये सत्ताधारी गटातील चार संचालकांनी राजीनामे दिले. त्यानंतर ...

Investigate the chaos in the GS | ग.स.तील अनागोंदी कारभाराची चौकशी करा

ग.स.तील अनागोंदी कारभाराची चौकशी करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.) मध्ये सत्ताधारी गटातील चार संचालकांनी राजीनामे दिले. त्यानंतर विरोधी गटानेही राजीनामे दिले आहेत. त्यानंतर ग.स.तील अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने केली आहे.

याबाबत महासंघाने जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ग.स.तील भरती प्रक्रिया ही नेहमीच वादग्रस्त असते. त्यामुळे पतपेढीत पद भरती करताना आर्थिक देवाणघेवाण तर करण्यात आलेली नाही, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. तसेच ग.स.मध्ये माहितीच्या अधिकाराची प्रक्रिया राबवण्यात यावी. ग.स.च्या संचालकांनी नोकर भरती, पदोन्नती, बदल्या या मनमानी पद्धतीने केल्याची भावना इतर सदस्यांमध्ये आहे. त्यामुळे त्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी देखील या निवेदनातून करण्यात आली आहे.

Web Title: Investigate the chaos in the GS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.