शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस म्हणून अंत्यंसस्कार होण्यापूर्वी वारसाचा लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 22:18 IST

जननायक फांऊडेशनचा पुढाकार ;पित्याचा मृतदेह पाहून मुलाने फोडला हंबरडा

जळगाव : तब्बल २० दिवसापासून घरातून गायब झालेल्या गुलशनखा मिरखा पठाण (५५, रा.कसाली मोहल्ला, अमळनेर) यांचा मृतदेह मंगळवारी निमखेडी शिवारात आढळून आला. त्यांची ओळख पटत नसल्याने बेवारस म्हणून त्याची जिल्हा रुग्णालयात नोंद घेण्यात आली. सरकारी नियमानुसार कालावधी पूर्ण झाल्यानंतर बेवारस म्हणूनच अंत्यविधी होणार होता, मात्र जननायक फांऊडेशनने पुढाकार घेऊन वारसांचा शोध घेतला, आणि पठाण यांचा अखेरचा चेहरा मुलाला पाहता आला...पित्याचा मृतदेह पाहून मुलाने एकच हंबरडा फोडला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निमखेडी शिवारात कांताई नेत्रालयाच्यासमोर गटारीत मंगळवारी सकाळी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी ही माहिती तालुका पोलिसांना कळविली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. ओळख स्पष्ट न झाल्याने तेथे बेवारस म्हणून नोंद घेण्यात आली. त्याचवेळी जननायक फांऊडेशनचे फरीद खान यांनी त्यांचा फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. सायंकाळी अमळनेर येथील नुरेखा पठाण यांनी खान यांच्याशी संपर्क साधून मृतदेहाबाबत माहिती घेतली. मुलगा तसेच अमळनेरचे नगरसेवक फिरोज उस्मानखा पठाण, मुशीर बयास व इतर नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठले. मृतदेह वडीलांचा असल्याचे पाहून त्यांनी हंबरडा फोडला.अन्न, पाण्याविना मृत्यू झाल्याचा संशयदरम्यान, जननायक फांऊडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान व सहकाऱ्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत रुग्णालयातील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह मुलाच्या ताब्यात दिला. फांऊडेशनच्या कार्यकर्त्यांनी ओळख पटविण्यासाठी पुढाकार घेतला नसता तर कुटुंब जिल्ह्यात असतानाही पठाण यांच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाले असते. दरम्यान, पठाण हे ५ नोव्हेंबरपासून घरातून बेपत्ता होते. काही अंशी ते मनोरुग्ण होते. पण ते घरी परत येत होते. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. अन्न, पाणी विना त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव