चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 22 - चाळीसगाव महाविद्यालयात युजीसी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकूल उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन शनिवारी खासदार ए.टी. पाटील यांच्याहस्ते झाले. उत्तर महाराष्ट्रातील अशा प्रकारचे हे एकमेव क्रीडा संकूल असल्याचे सांगण्यात आले. उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, प्रा.साहेबराव घोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.1 कोटी 10 लाख रुपये खर्चचार बॅडमिंटन कोर्ट, उडन फ्लोअरींग असलेले हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकूल आहे. 1 हजार 30 चौरस मीटर क्षेत्र असून टेबल टेनिस, बॅडमिंटन, बॉस्केट बॉल, मॅट कुस्ती यासह अनेकविध क्रीडा सुविधा येथे उपलब्ध आहेत.
चाळीसगावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकूल
By admin | Updated: April 22, 2017 15:20 IST