शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळे गाजण्यापेक्षा ‘वाजले’ पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 19:24 IST

हितेंद्र काळुंखेजळगाव : जिल्हा परिषदेत अनेक घोटाळे गाजले आणि लागोपाठ गाजतही आहेत. मात्र एखादा फुगा फुगावा आणि पंक्चर होवून त्यातील हवा निघून जावी, याप्रमाणेच प्रत्येक घोटाळ्यांचे होत आहे. शालेय पोषण आहार, गणवेश घोटाळा, अपंग युनीट घोळ अशी अनेक प्रकरणे पुढे आली मात्र काळाच्या ओघात मागे पडली. नुकतेच बुरशीयुक्त शेवयांचे प्रकरण ...

हितेंद्र काळुंखेजळगाव : जिल्हा परिषदेत अनेक घोटाळे गाजले आणि लागोपाठ गाजतही आहेत. मात्र एखादा फुगा फुगावा आणि पंक्चर होवून त्यातील हवा निघून जावी, याप्रमाणेच प्रत्येक घोटाळ्यांचे होत आहे. शालेय पोषण आहार, गणवेश घोटाळा, अपंग युनीट घोळ अशी अनेक प्रकरणे पुढे आली मात्र काळाच्या ओघात मागे पडली. नुकतेच बुरशीयुक्त शेवयांचे प्रकरण गाजले. सर्वसाधारण सभेत संबधितांवर गुन्हा दाखल करण्याचा ठरावही झाला मात्र तांत्रिक बाबींमुळे तो दाखल करता आला नाही.आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा करण्यात आली. बुरशीयुक्त शेवयांच्या अहवालही आला. आश्चर्य वाटावे असा हा अहवाल होता. ज्या शेवया अगदी बुवरशीयुक्त होत्या त्या शेवया खाण्यायोग्य असल्याचा अहवाल आला, यामुळे संबंधितावर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही, असा अभिप्राय आयुक्त कार्यालयाने दिला. ज्या बुरशी युक्त शेवया पाहिल्यावर कोणीही सांगेल की त्या खाण्यास घातक आहेत, त्या शेवयांचा अहवाल असा आलाच कसा? या विचाराने सारेच हैराण झाले.. हतबल झाले. एखादे गाढव सर्वांनी पाहिले आणि मात्र त्याबाबत घोडा असल्याचा अभिप्राय यावा, असाच हा प्रकार घडला. मात्र पुन्हा दुसरीकडे शहानिशा करण्याची सोयही राहिली नाही. कारण सर्व नमुनेच गायब झाले आहे. हे नमुने गायब कसे झाले? याचा जाब जि. प. सदस्यांनी विचारुन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. परंतु अधिकारी म्हणतात की मला नमुनेच मिळाले नाही. आता पुन्हा पुरावे आणि तांत्रिक बाबींचा आधार घेतला जाईल आणि निष्कर्ष झिरो येईल असाच आपर्यंतचा अनुभव आहे. हे प्रकरण संपत नाही तोच असोदा येथे परवाच तीन मुलांना शेवया खाल्ल्याने विषबाधा झाली. सुदैवाने गंभीर प्रकार घडला नाही. या घटनेनंतर जि.प. सदस्या पल्लवी देशमुख यांचे पती रवी देशमुख यांनी बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांना जाब विचारल्यावर त्यांनी शेवयांचे पाकिटे जमा करण्याच्या सूचना दिल्या परंतु असा खराब माल येतच राहिला आणि अहवाल आश्चर्यकारक अर्थात चुकीचे येत असेल तर चलाखी कोठे होते? हे पाहणे गरजेचे असून एखादे प्रकरण गाजण्यापेक्षा संबंधित दोषींना कायद्याच्या दणक्याने कसे वाजवले जाईल, यादृष्टीनेच प्रयत्न होणे गरजेचे आहे. तरच असे घोटाळे नियंत्रणात येतील.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव