शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

११ जुलैपर्यंत अस्थिरता कायम, ॲड. उज्ज्वल निकम यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 08:02 IST

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, याबाबतीत विधानसभेचे उपाध्यक्ष व प्रतोद यांनादेखील त्यांचे यावर काय म्हणणे आहे, हे सांगण्याकरिता ११ जुलैपर्यंत शपथपत्र दाखल करावे व १६ आमदारांना त्यांच्या अपात्रतेच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे.

जळगाव : शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरविण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज दोन प्रश्न उपस्थित झाले. त्यात विधानसभा उपाध्यक्षांनी १६ आमदारांना अपात्र का करू नये, ही बजावलेली नोटीस अवैध आहे. कारण त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला आहे. सरकार अल्पमतात असल्याने त्यांना अपात्र करण्याचा अधिकार नाही. याउलट सत्ताधारी शिवसेना प्रतोदाचे आदेश न पाळल्याने त्यांना पक्षातून पर्यायाने आमदार म्हणून अपात्र का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना कायदेशीर हक्क नाही, असे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी सोमवारी ‘लोकमत’ला सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, याबाबतीत विधानसभेचे उपाध्यक्ष व प्रतोद यांनादेखील त्यांचे यावर काय म्हणणे आहे, हे सांगण्याकरिता ११ जुलैपर्यंत शपथपत्र दाखल करावे व १६ आमदारांना त्यांच्या अपात्रतेच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. म्हणजेच ११ जुलैपर्यंत  ही अस्थिर परिस्थिती कायम राहील. विधानसभेत सरकार बहुमतात आहे किंवा अल्पमतात आहे, हे ठरविण्याचा अधिकार फक्त विधीमंडळातील सदस्यांना आहे. हा प्रश्न न्यायालयाच्या माध्यमातून सोडविला जाऊ शकत नाही. 

दोन्ही गटांना मिळाला अंशत: दिलासाशिवसेनेच्या दोन गटांतील वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर  पहिली बाब म्हणजे पक्षांतरबंदीच्या अपात्रतेचा मुद्दा हा ‘जैसे थे’ ठेवण्यात आला. त्याचा फायदा एकनाथ शिंदे गटाला झाला. त्याचबरोबर  विधिमंडळ पक्षाचा गटनेता बदलण्याच्या निर्णयाला अजून स्थगिती मिळालेली नाही. त्याचा फायदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळालेला आहे. या दोन्ही गटांकडून ताकद, पैसा आणि वेळ वाया घालवला गेला. गेले सात दिवस राजकीय पहिलवानांच्या लढतीत महाराष्ट्रातील नागरिकांच्या महत्त्वाच्या अन्य प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. या दोन्ही गटांकडून दोन डाव टाकून झाले आहेत. पुढचे डाव रचले जातील आणि ती लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढली जाईल.      - ॲड. उदय वारुंजीकर 

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेना