शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी साहित्य ठरले लेखनाची प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:07 IST

इयत्ता तिसरीत शिकत असताना मला वाचनाचं व्यसन जडलं. किराणा दुकानातून आणलेल्या वस्तूंसोबत असलेला कागद मी वाचल्याशिवाय बाजूला फेकत नसे. वाचनाच्या या व्यसनात भर पडली ती गल्लीत त्या काळी प्रौढ शिक्षण निरंतर कार्यक्रम सुरू झाल्यामुळे. या कार्यक्रमात प्रौढ वाचकांसाठी विविध विषयांवरील अनेक पुस्तके समाविष्ट असलेली लायब्ररी सुरू झाली होती. वार्षिक परीक्षा ...

इयत्ता तिसरीत शिकत असताना मला वाचनाचं व्यसन जडलं. किराणा दुकानातून आणलेल्या वस्तूंसोबत असलेला कागद मी वाचल्याशिवाय बाजूला फेकत नसे. वाचनाच्या या व्यसनात भर पडली ती गल्लीत त्या काळी प्रौढ शिक्षण निरंतर कार्यक्रम सुरू झाल्यामुळे. या कार्यक्रमात प्रौढ वाचकांसाठी विविध विषयांवरील अनेक पुस्तके समाविष्ट असलेली लायब्ररी सुरू झाली होती. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर पुन्हा शाळा सुरू होईपर्यंत बराच कालावधी मिळत असे. याच कालावधीत लायब्ररीत मिळणारी अनेक विषयाची अनेक पुस्तके वाचली.इयत्ता सातवी-आठवीत असताना वाचनाचं वेड शिगेला पोहोचलं. प्रा. प्र. ई. सोनकांबळे यांचे ‘आठवणीचे पक्षी’ हे पुस्तक मित्राकडून एका दिवसासाठी मिळाले. घरी रॉकेलच्या चिमणीशिवाय प्रकाशाची दुसरी सोय नव्हती. रात्र सुरू झाल्यापासून सकाळी चार वाजेपर्यंत हे पुस्तक आईवडिलांना वाचून दाखवत असताना आई-वडिलांसह अनेक वेळा रडलो. आई म्हणाली, ‘हे पुस्तक लिहिणारे लेखक आणि आपण समदु:खी आहोत.’ मलाही वाटायला लागले की, आपण जे जगलो, जे भोगले ते उजागर करावे. त्यासाठी त्या वेळी मला साहित्याचे प्रकार कळत नव्हते. पाठ्यपुस्तकातील सर्व कविता तोंडपाठ करायचो, एकटा असताना कविता गुणगुणायचो. त्यामुळे कविता जवळची वाटली. कविता हाच साहित्याचा आत्मा असतो. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरंही आहे. कवी, साहित्यिक हे द्रष्टे असतात. लोकमतसह अनेक नियतकालिकांमधून कविता प्रकाशित झाल्या आहेत.- डॉ.दिलीप लोखंडे

टॅग्स :Jalgaonजळगाव