शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

पाणी टँकर घोटाळाप्रकरणी फैजपूर प्रांताधिकाऱ्यांकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 19:33 IST

भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा येथील पाणी टँकर गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात फैजपूर येथील प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी शनिवारी चौकशी केली असून, तालुक्यात ज्या गावांना टँकर देण्यात आले आहे, त्या गावांना भेटी देऊन पाहणी केली.

ठळक मुद्देप्रकरणाला ‘लोकमत’ने फोडली वाचामहादेव तांडा, कन्हाळा बुद्रूक, कंडारी, भुसावळ ग्रामीण आदी ठिकाणीही जाऊन केली पाहणीटँकरमधील लॉक बुक, रजिस्टर, ट्रँकर कुठे भरले जाते, कुठे खाली केले जाते यासंदर्भात केली चौकशीप्रांताधिकाऱ्यांसोबत होता अजून एक अधिकारी

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील महादेव तांडा येथील पाणी टँकर गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात फैजपूर येथील प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी शनिवारी चौकशी केली असून, तालुक्यात ज्या गावांना टँकर देण्यात आले आहे, त्या गावांना भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान, यासंदर्भात नागपूर येथील आमदार सुनील केदार यांनी लक्षवेधी टाकली आहे. त्यामुळे टँकर माफियामध्ये एकच खळबळ उडाली आहे.‘लोकमत’ने यासंदर्भात स्टिंग आॅपरेशन केले होते व या भ्रष्टाचाराचा पदार्फाश केला आहे. याची दखल घेऊन जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी जिल्हा परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाºयांना दिले आहे, तर आमदार केदार यांनी या प्रकरणाची दखल घेतली घेतली आहे व त्यांनीही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भातील लक्षवेधी दाखल केली आहे, तर जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी फैजपूर येथील प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांची नियुक्ती केली असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात डॉ.थोरबोले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कुºहे (पानाचे) येथील ग्रामपंचायत कार्यालयात येऊन या प्रकरणाचे ग्रामविकास अधिकारी पी.टी. झोपे यांच्याकडून काही कागदपत्रांची मागणी व चौकशी केली. त्याचप्रमाणे त्यांनी महादेव तांडा येथे जाऊन माहिती घेतली, तर भुसावळ तालुक्यातील टँकर सुरू असलेल्या कन्हाळा बुद्रूक, कंडारी, भुसावळ ग्रामीण आदी ठिकाणीही जाऊन पाहणी केली.यावेळी प्रांताधिकारी थोरबोले यांच्यासोबत पंचायत समितीचा एक अधिकारी असल्याचे दिसून आले. या प्रकरणी पंचायत समितीचे संबंधित अधिकारी योग्य ती माहिती देत नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ही चौकशी कशी होते, यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.यावेळी प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी टँकरमधील लॉक बुक, रजिस्टर, ट्रँकर कुठे भरले जाते, कुठे खाली केले जाते यासंदर्भात चौकशी केल्याचे सांगण्यात आले.‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले त्यावेळी महादेव तांड येथील रजिस्टर कोरे होते. कोºया रजिस्टरवर महिलांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. या रजिस्टरवर टँकर कुठे भरले, कुठून आले, किती वाजता आले, कोणतीही माहिती भरण्यात आलेली नव्हती, तर भुसावळ ग्रामीण येथे तर रजिस्टरही उपलब्ध नव्हते. एका नोटबुकवर केवळ सह्या घेण्यात आल्या होत्या. या रजिस्टरमध्येही कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर मात्र पंचायत समितीने नंतर रजिस्टर पूर्ण करण्याचा प्रताप केला असल्याचे समजते.दरम्यान, नागपूर येथील काँग्रेसचे आमदार केदार त्यांनी विधानसभेत लक्षवेधी (क्रमांक १४०४०) टाकलेली आहे. यामध्ये महादेव तांडा येथे गेल्या वर्षभरापासून एमएच-१९-झेड-१२२० या टँकरने पाणीपुरवठ्यासंदर्भातील विचारणा केली असून, विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. ही लक्षवेधी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री त्याचप्रमाणे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे दाखल केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ