शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अंजली दमानिया यांची चौकशी करा : एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:03 IST

मुख्यमंत्र्यांकडे केली विशेष तपास पथकामार्फत चौकशीची मागणी

ठळक मुद्देकल्पना इनामदार घटनाक्रम मांडण्यास तयारखडसे कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा दमानिया यांच्याकडून हेतुपुरस्सर प्रयत्नदमानिया यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे चौकशीतून निष्पन्न

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१७ : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माझ्याविरुध्द रचलेल्या कटकारस्थानाची बृहन्मुबई पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. खडसे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.खडसे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून अंजली दमानिया या माझ्या व माझ्या कुटुंबियांविरुध्द बेछुट आरोप करीत आहेत. त्यांच्या या आरोपांचे खंडन वेळावेळी प्रसारमाध्यमे, विधीमंडळ तसेच विविध पक्षांच्या जाहीर सभांमधून केलेले आहे.दमानिया यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे चौकशीतून निष्पन्न झालेले आहे, मात्र तरीही दमानिया यांच्याकडून आरोप करण्याचे प्रकार थांबत नाहीत. खडसे कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न दमानिया यांच्याकडून हेतुपुरस्सर केला जात आहे.कल्पना इनामदार घटनाक्रम मांडण्यास तयारसामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया या खडसे यांना अडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले होते. मला खडसेंना अडकवायचे आहे. त्यासाठी मी तुम्हाला पैसे देते, त्यासोबत काही पत्र देते. त्यासंदर्भात तुम्ही खडसे यांच्या कार्यालयात जा व पैसे खडसे यांच्या टेबलावर ठेवा त्यानंतर मी लगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला घेऊन येते असे दमानिया यांनी इनामदार यांना सांगितले. इनामदार यांनी असे करण्यास नकार दिल्यानंतरही तीन तास त्यांना समजावण्यात आले. हा सारा प्रकार इनामदार या पोलिसांसमोर मांडण्यास तयार आहेत. इनामदार यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे तपासण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करुन त्यामार्फत चौकशी करावी अशी मागणी खडसे यांनी केली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावEknath Khadaseएकनाथ खडसे