२०१९ पर्यंत ३० हजार किमीचे रस्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:29 AM2018-04-17T01:29:31+5:302018-04-17T01:29:31+5:30

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्यात ३० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते डिसेंबर २०१९ पूर्वी पूर्ण करावे. तसेच हायब्रिड अ‍ॅन्युईटी रस्त्यांच्या कामांसाठी तातडीने कार्यारंभ आदेश देऊन पावसाळ्यापूर्वी कामे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले.

By 2019, 30 thousand km of roads, Chief Minister Devendra Fadnavis instructed: | २०१९ पर्यंत ३० हजार किमीचे रस्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश :

२०१९ पर्यंत ३० हजार किमीचे रस्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश :

googlenewsNext

मुंबई : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्यात ३० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते डिसेंबर २०१९ पूर्वी पूर्ण करावे. तसेच हायब्रिड अ‍ॅन्युईटी रस्त्यांच्या कामांसाठी तातडीने कार्यारंभ आदेश देऊन पावसाळ्यापूर्वी कामे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले.
हायब्रिड अ‍ॅन्युईटी रस्त्यांच्या कामांचा आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांचा आढावा फडणवीस यांनी मंत्रालयात घेतला. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री म्हणाले, आतापर्यंत १४ हजार ८४४ किमीच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ४४५२ किमीचे रस्ते पूर्ण झाले असून ६७५६ लांबीच्या रस्त्यांची कामे पुढील महिन्यात सुरू होणार असून उर्वरित रस्त्यांच्या कामांना सप्टेंबरपर्यंत कार्यारंभ आदेश देऊन आॅक्टोबरपासून कामांना सुरुवात करावी. ग्रामीण महाराष्ट्रात विकासाला गती देण्यासाठी हे रस्ते महत्त्वाची भूमिका बजावणार असून डिसेंबर २०१९ पूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

हायब्रिड अ‍ॅन्युईटी अंतर्गत ९२३८ कि.मी. लांबीचे रस्ते
हायब्रिड अ‍ॅन्युईटी अंतर्गत १९५ रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार असून नागपूर विभागात ३३ कामांच्या माध्यमातून १३५८ कि.मी. लांबीचे रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. अमरावती विभागात ३२ कामांच्या माध्यमातून १५२७ कि.मी. लांबीचे रस्त्यांचे काम केले जाणार आहे.
औरंगाबाद विभागात ३२ कामांच्या माध्यमातून १९२० कि.मी., नाशिक विभागात ३१ कामांच्या माध्यमातून १२५७ कि.मी, पुणे विभागात २५ कामांच्या माध्यमातून १७७५ कि.मी., मुंबई विभागात ४२ कामांच्या माध्यमातून १४०२ कि.मी. असे एकूण १९५ कामांच्या माध्यमातून ९२३८ कि.मी. लांबीचे रस्ते केले जाणार आहेत.

2018 मार्च मध्ये नव्याने २१ कामांना मंजुरी देण्यात आली असून त्या माध्यमातून १००१ कि.मी. लांबीचे रस्ते तयार होणार आहेत.

Web Title: By 2019, 30 thousand km of roads, Chief Minister Devendra Fadnavis instructed:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.