शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

जळगाव येथे कारागृहात कैद्याने स्वत:वर केला धारदार शस्त्राने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 12:29 IST

न्यायालयीन तारखेला मुकला

जळगाव : न्यायालयीन तारखेवर हजर न केल्याने रवीसिंग मायासिंग बावरी याने पत्र्याच्या धारदार तुकड्याने स्वत:च्या हातावर वार केल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजता कारागृहात घडली. कारागृह कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली.रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात रवीसिंग मायासिंग बावरी, सत्यासिंग मायासिंग बावरी व मलीनसिंग मायासिंग बावरी हे तीन भाऊ आरोपी आहेत. २०१७ पासून हे तीनही न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात आहेत. गुरुवार दि, 3 आॅक्टोबर रोजी रवीसिंग बावरीसह दोन्ही भावांची न्यायालयात तारीख होती. बावरी बंधूना न्यायालयात हजर करण्याकरीता मागणीप्रमाणे पोलीस पथक न आल्याने त्याला हजर ठेवता आले नाही. न्यायालयात हजर न केल्याचा संतापात दुपारी रवीसिंग बावरी याने लोखंडी पत्र्याच्या तुकड्याने दोन्ही हातावर वार करण्यास सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.गार्ड न मिळाल्याने हजर करता आले नाहीकैद्यांना न्यायालयात तारखेवर हजर करण्यापूर्वी पोलीस विभागाला गार्ड म्हणून कर्मचारी मिळावे म्हणून पत्रव्यवहार करण्यात येतो. त्यानुसार ३ रोजी बावरी यांच्यासह ज्या कैद्यांना न्यायालयात हजर करावयाचे होते. त्यासाठी १ आॅक्टोबरला पोलिसांना पत्र देण्यात आले. तरीही गुरुवारी १ वाजेपर्यंत गार्ड म्हणून एकही कर्मचारी आला नाही. पोलीस पथक नसल्याने कैद्याचे रिमांड वारंट तारीख वाढविण्यासाठी न्यायालयात पाठविण्यात आले होते.जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलयाप्रकरणी कारागृहात शासकीय कामात अडथळा आणून कारागृहातील सुरक्षा व शिस्तीस बाधा आणून नियमांचे उल्लंघन केला तसेच कारागृह प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करुन गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केले आहे. याप्रकरणी हवालदार विजय निकम यांच्या फिर्यादीवरुन रविसिंग मायासिंग बावरी याच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयात हजर करावयाच्या बंदीकरीता पोलीस पथक मिळावे म्हणून १ आॅक्टोबर रोजी पोलीस मुख्यालयाला पत्र देण्यात आले होते. मात्र मागणीनुसार पथक न आल्याने बावरी भावांना न्यायालयात हजर करता आले नाही. त्यामुळे रविसिंग बावरीने ते स्वत:वर पत्र्याने वार केले. वरिष्ठांना तसेच न्यायालयात याबाबत कळविण्यात येणार आहे.-अनिल वांढेकर, प्रभारी अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह

टॅग्स :Jalgaonजळगाव